क्राईम न्यूजमहाराष्ट्र
Trending

ACB Trap Beed | बीड महिला बाल स्वाधार गृहातुन मुलीला सोडविण्यासाठी १२ हजारांची लाच घेणारा बाल कल्याण समितीचा सदस्य अँटी करप्शनच्या ताब्यात

  • लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधिक्षक संदीप आटोळे यांच्याकडून कारवाईचा सपाटा
  • बीड येथील कारवाईने प्रथमच महिला बाल स्वाधार गृहाच्या कामकाजाचा भांडाफोड

बीड, दि. २१ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : ACB Trap Beed

ACB Trap Beed | लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने महिला बाल स्वाधार गृहात चाललेल्या भोंगळ कारभाराचा भांडाफोड झाला आहे. मुलीला सोडविण्यासाठी १२ हजारांची लाच स्वीकारणारा बाल कल्याण समितीचा सदस्य रंगेहाथ पकडण्या आल्याने बीड जिल्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधिक्षक संदीप आटोळे ACB SP Sandeep Aatole यांच्या नेत्तृत्वाखाली शासकीय विभागातील भ्रष्टाचार उखडून काढण्यात येत आहे. ACB Trap Beed

संशयित सुरेश प्रभाकर राजहंस, वय 40 वर्ष, व्यवसाय- बाल कल्याण समिती सदस्य, बीड (मानधन तत्वावर), राहणार – शिंदे नगर फेज वन कॅनल रोड बीड याला ताब्यात घेण्यात आले आहे. ACB Trap Beed

आज दि. २१ ऑक्टोबर रोजी बाल कल्याण समितीचे कार्यालय, चांदमोरी धानोरा रोड, बीड येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बीड पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी सापळा कारवाई केली आहे.

यातील तक्रारदार यांची मैत्रीण महिला बाल स्वाधार गृहात दाखल असून तिला तक्रारदार यांनी सोडवण्या करिता दि.18/10/2024 रोजी अर्ज केला होता त्यावरून सदरील मुलीला तक्रारदार यांचे ताब्यात देण्यासाठी बालकल्याण समितीचे सदस्य सुरेश राजहंस यांनी स्वतः करिता व समितीतील इतर सदस्य करिता 50 हजाराची लाच मागणी करून तडजोडांती 12 हजार रुपये घेण्याचे पंचा समक्ष मान्य करून सापळा कारवाई दरम्यान 12000 रुपये लाच रक्कम स्वतः घेताना सुरेश राजहंस याना बाल कल्याण समिती चे कार्यालयात लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आले. पो.स्टे.शिवाजी नगर ,बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

acb sp sandeep aatole
ACB C.Sambhajinagar SP Sandeep Aatole

सदर कारवाई छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे यांच्या नेत्तृत्वाखाली सापळा अधिकारी युनूस शेख, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.बीड, पोलीस अंमलदार, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0