Explosion in Chamunda Barud Company : नागपूरच्या बारूद कंपनीत स्फोट, पाच जणांचा मृत्यू, अनिल देशमुख घटनास्थळी पोहोचले
Explosion in Chamunda Barud Company in Nagpur district : नागपुरातील चामुंडा बारूद कंपनीत स्फोट झाला आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर :- नागपुरातील एका कंपनीत स्फोट झाला आहे. नागपुरातील धामना परिसरातील चामुंडा बारूद कंपनीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. (Explosion in Chamunda Barud Company in Nagpur district)
आता याप्रकरणी नागपूर पोलीस आयुक्तांचे दिलेल्या माहितीच्या आधारे असे सांगण्यात येत आहे की,धामना येथील स्फोटक बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान 5 जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचणार आहे. मात्र, राष्ट्रवादी-काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख घटनास्थळी पोहोचले आहेत. (Explosion in Chamunda Barud Company in Nagpur district)
Web Title : Explosion in Chamunda Barud Company : Explosion in Barud Company of Nagpur, five people died, Anil Deshmukh reached the spot