भेटायला बोलवून तरुणावर कोयत्याने वार
विनाकारण वाद घालून संशयिताने केला हल्ला
PG
Prashik Ghaste
1 min read

विनाकारण वाद घालून संशयिताने केला हल्ला
पिंपरी : एका तरुणाला भेटायला बोलावून त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी (२६ मे) रोजी रात्री साडेआठ वाजता चिखली येथील संविधान चौकात घडली आहे. विजय रवि कांबळे (28, अजिंठानगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर अमित तानाजी जानराव (घरकुल, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणी विजय कांबळे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अमित याने फिर्यादी विजय यांना चिखली येथील संविधान चौकात भेटण्यासाठी बोलावून घेतले. तिथे विनाकारण वाद घालून आरोपीने त्याच्याकडील कोयत्याने विजयच्या डोक्यावर, डाव्या हाताच्या पंजावर आणि उजव्या हाताच्या बोटांवर वार करून गंभीर दुखापत केली. चिखली पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


