Ratnapur News : ब्रेक निकामी झाल्याने बस १०० फूट खोल खड्ड्यात; २७ प्रवासी जखमी
Ratnapur News : रत्नापूर : ब्रेक निकामी झाल्याने बाशीर आगाराची बाशीर-कळंब बस येरमाळा घाटात सुमारे १०० फूट खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाली.
1 min read

Ratnapur News : रत्नापूर : ब्रेक निकामी झाल्याने बाशीर आगाराची बाशीर-कळंब बस येरमाळा घाटात सुमारे १०० फूट खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाली. ही घटना बुधवारी (दि. ९) रात्री घडली. या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी सात जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.https://maharashtramirror.com/ Ratnapur News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाशीर आगाराची एमएच ११ बीएल ९३५३ क्रमांकाची बस बाशीरहून कळंबच्या दिशेने जात होती. बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. येरमाळा घाटात बस चढत असताना ती पुढे जात नव्हती. त्यामुळे चालकाने काही प्रवाशांना बसमधून खाली उतरविले, तर काही प्रवासी बसमध्येच थांबले.https://maharashtramirror.com/ Ratnapur news
यानंतर चालकाने बस पुन्हा घाट चढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस वर चढत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. बस मागे येत रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे १०० फूट खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातात बसमधील २७ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी सात प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.


