Pune News : येरवड्यातील डांबर प्लांटवरून नगरसेविका व अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : एकिकडे पुण्यात प्रदूषणाच्या कारणावरून शहरातील आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवण्याची भूमिका घेतली जात असताना येरवड्यात नव्याने उभारण्यात आलेल्या डांबर प्लांटवरून पालिकेचे अधिकारी आणि नगरसेविका अश्विनी लांडगे यांच्यात दोन दिवसांपूर्वी चांगलीच खडाजंगी झाली.
3 min read

Pune News : अखेर नवा डांबर प्लांट बंद"महापौरांपेक्षा बनकर मोठे झाले का?' नगरसेविका अश्विनी लांडगेंचा खडा सवाल
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : एकिकडे पुण्यात प्रदूषणाच्या कारणावरून शहरातील आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवण्याची भूमिका घेतली जात असताना येरवड्यात नव्याने उभारण्यात आलेल्या डांबर प्लांटवरून पालिकेचे अधिकारी आणि नगरसेविका अश्विनी लांडगे यांच्यात दोन दिवसांपूर्वी चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी महापौरांचा आदेश डावलत नव्याने उभारण्यात आलेला डांबर प्लांट चालू केल्याचे पाहता नगरसेविका लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेत एका दिवसातच प्लांट बंद पाडला.https://maharashtramirror.com/Pune News
प्रदूषणाच्या कारणावरून शहरातील आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवण्याची भूमिका घेतली जात असताना येरवड्यात मात्र डांबर प्लांटला परवानगी कशी दिली जाते? असा संतप्त सवाल मागील आठवड्यात झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत नगरसेविका लांडगे यांनी उपस्थित केला होता. येरवड्यातील नागरिक गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून डांबर प्लांटचा त्रास सहन करत असताना त्याच ठिकाणी आणखी एक प्लांट सुरू करण्यात आला आहे. मात्र, प्रभागातील नगरसेवकांनी या नव्या प्लांटला विरोध केला असून, जुन्यासह नवा प्लांटदेखील शहराबाहेर हलवण्यात यावा अशी मागणी लांडगे यांच्यासह प्रभागातील इतर नगरसेविकांनी केली आहे. विशेष बाब म्हणजे, महाराष्ट्र शासन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकृत प्रमाणपत्र न घेताच अधिकाऱ्यांनी तेथे नवा प्लांट सुरूदेखील केला. त्यामुळे नगरसेवक अधिकाऱ्यांनामध्ये नव्या वादाला तोंड फुटले.
महापौरांपेक्षा बनकर मोठे झाले का? नगरसेविका अश्विनी लांडगेंचा खडा सवाल
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मिररशी बोलताना नगरसेविका लांडगे म्हणाल्या, पुण्यात २५ वर्षांपूर्वी जुना डंबर प्लँट सुरू करण्यात आला होता, त्या वेळी तिथे लोकवस्ती खूप कमी होती. काळानुसार लोकवस्ती वाढल्यामुळे सन २०१७ पासून नागरिक व स्थानिक प्रतिनिधी महापालिकेला पत्र देऊन डांबर प्लांट इतरत्र बदलण्याची मागणी करत आहोत. मागील वर्षी याप्रकरणी आंदोलनही करण्यात आले होते, ज्यावर अधिकाऱ्यांनी जागा पाहणी करून जागा मिळाल्यावर शिफ्ट करण्याचे आश्वासन दिले होते. पण डांबर प्लांट बंद करुन चालणार नाही कारण पुण्यात एकमेव डांबर प्लांट आहे, असे त्यावेळी पावसकर यांनी सांगितले होते.https://maharashtramirror.com/ Pune News
असे असतानादेखील नवा प्लांट सुरु करण्यात आला. विशेष म्हणजे, महाराष्ट्र शासन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकृत प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यामुळे तो प्लांट सुरु करु नका असे आदेश महापौर नागपुरे यांनी दिले होते. मात्र, त्यांचा हा आदेश डावलून अधिकाऱ्यांनी नवा प्लांट सुरु करण्यात आला होता. दोन दिवसापूर्वी ही घटना घडली असून यावेळी महापौरांपेक्षा बनकर मोठे झाले का? असा खडा सवाल उपस्थित करत नगरसेविका अश्विनी लांडगे व डॅनियल लांडगे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. https://maharashtramirror.com/ Pune News
घटनास्थळी नेमकं काय घडले?
नवा प्लांट बसवल्यानंतर महाराष्ट्र शासन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकृत प्रमाणपत्र न घेताच तो लगेच सुरु करण्यात आला. त्यावेळी डांबर प्लांट नगरसेविका अश्विनी लांडगे व डॅनियल लांडगे हे घटनास्थळी पोहोचत, अधिकाऱ्यांशी भिडले. अधिकाऱ्यांनी महापौरांचा आदेश डावललाय का? मग बनकर साहेब काय महापौरांपेक्षा मोठे झालेत का? एक लाखाचा प्रभाग आहे, या प्लांटमुळे सगळ्यांच्या तोंडात माती जातेय. तुम्ही लोकांना मारायला लागलाय. बंद करायचं, चालू नाही करायचं प्लांट.'' अशी आक्रमक भुमिका यावेळी नगरसेविका लांडगे यांनी या वेळी घेतली. "जिवंतपणी अन्नात माती घालताय तुम्ही लोक,'' अशा शब्दात डॅनियल लांगडे यांनी अधिकाऱ्यांवर आरोप केले. त्यानंतर नवा प्लांट बंद करण्यात आला. https://maharashtramirror.com/ Pune News
या सर्व घडामोडीनंतर महापौर मंजुषा नागपुरे यांनी घटनास्थळी भेट देत येरवडा परिसरातील डांबर प्लांटमुळे होणारी धूळ व प्रदूषणाचा स्थानिक नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आज प्लांटला प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी धूळ व धूर नियंत्रणात आणण्याच्या आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने अमलात आणण्याच्या कडक सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. https://maharashtramirror.com/ Pune News
६ महिन्यात प्लांट स्थलांतराचे महापौरांचे आश्वासन
दरम्यान, या वादानंतर महापौैर मंजुषा नागपुरे यांनी घटनास्थळी भेट देत ६ महिन्यात प्लांट स्थलांतर करण्यात येईल असे आश्वासन दिले. काही दिवसांसाठी जुना डांबर प्लांट चालू ठेवा कारण पुण्यात हा एकच प्लांट आहे. सध्या शहरात रस्ते दुरुस्तीचे काम चालू आहे त्यामुळे हा प्लांट चालू राहणे गरजेचे असल्याचे यावेळी महापौर म्हणाल्या. तसेच, स्थलांतराचा ठराव दिल्यानंतर तो मान्य केल्यानंतर ६ महिन्यात प्लांट स्थलांतर करण्यात येईल असे आश्वासन महापौर यांनी दिले आहे. त्यामुळे सध्या जुना प्लांट सुरु असल्याचे लांगडे म्हणाल्या.


