Skip to content

Mumbai News : बावनकुळेंच्या वक्तव्यावर यशोमती ठाकूर यांचा पलटवार; राहुल गांधींवरील टीकेवरून दिला इशारा

Mumbai News : मुंबई : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

बावनकुळेंच्या वक्तव्यावर यशोमती ठाकूर यांचा पलटवार; राहुल गांधींवरील टीकेवरून दिला इशारा
बावनकुळेंच्या वक्तव्यावर यशोमती ठाकूर यांचा पलटवार; राहुल गांधींवरील टीकेवरून दिला इशारा

Mumbai News : मुंबई : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याबद्दल ठाकूर यांनी बावनकुळेंवर जोरदार पलटवार करत, टीका करताना जिभेवर लगाम ठेवावा, असा इशारा दिला.https://maharashtramirror.com/ Mumbai news

बावनकुळे यांनी यापुढेही अशाच प्रकारची वक्तव्ये सुरू ठेवली, तर त्यांना आग्रा येथील मानसिक रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करू, असे वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केले. राहुल गांधी यांच्यावरील वैयक्तिक टीका काँग्रेस सहन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Mumbai news

दरम्यान, बुलढाण्यातील चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरही ठाकूर यांनी भाष्य केले. राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय नाकारला असला, तरी त्यांच्यावर सरकारकडून दबाव असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.

कठीण काळात राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना पाठिंबा दिला आहे, असेही यशोमती ठाकूर यांनी नमूद केले. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याऐवजी राजकीय मुद्द्यांवर चर्चा करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share