Skip to content

Mumbai News: ‘परिवर्तन दहीहंडी’साठी वरळीत वाहतूक बदल

Mumbai News : मुंबई, महाराष्ट्र मिरर : वरळीतील जांबोरी मैदान येथे शनिवारी (दि.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

‘परिवर्तन दहीहंडी’साठी वरळीत वाहतूक बदल जी. एम. भोसले मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी; शनिवार दुपारपासून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
‘परिवर्तन दहीहंडी’साठी वरळीत वाहतूक बदल जी. एम. भोसले मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी; शनिवार दुपारपासून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai News : जी. एम. भोसले मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी; शनिवार दुपारपासून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai News : मुंबई, महाराष्ट्र मिरर: वरळीतील जांबोरी मैदान येथे शनिवारी (दि. ५) आयोजित करण्यात आलेल्या ‘परिवर्तन दहीहंडी उत्सव-२०२६’च्या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. जी. एम. भोसले मार्गावर वरळी नाका ते कुरणे चौक या टप्प्यात वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार असून, मार्गाच्या दोन्ही बाजूंना आवश्यकतेनुसार ‘नो-पार्किंग’ लागू राहणार आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

दहीहंडी उत्सवासाठी मोठ्या संख्येने गोविंदा पथके तसेच चारचाकी आणि दुचाकी वाहने जांबोरी मैदान परिसरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी तात्पुरती वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. हे निर्बंध शनिवार (दि. ५) दुपारी १२ वाजल्यापासून आवश्यकतेनुसार लागू राहतील.https://maharashtramirror.com/ Mumbai News

अधिसूचनेनुसार, जी. एम. भोसले मार्गावर वरळी नाका ते कुरणे चौकदरम्यान सर्वसामान्य वाहनांना प्रवेश निषिद्ध राहणार आहे. तसेच या मार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवर आवश्यकतेनुसार ‘नो-पार्किंग’ लागू करण्यात येणार आहे. मात्र, शासकीय वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने आणि रुग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

उत्तर वाहिनीवरील वाहनचालकांनी वरळी नाका येथून डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पोदार जंक्शन, ग्लॅक्सो जंक्शन येथून उजवे वळण घेऊन पांडुरंग बुधकर मार्ग, कुरणे चौकमार्गे पुढे इच्छित स्थळी जावे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

दक्षिण वाहिनीवरील वाहनचालकांनी कुरणे चौकातून पांडुरंग बुधकर मार्ग, ग्लॅक्सो जंक्शन येथून डावे वळण घेऊन डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पोदार जंक्शन आणि वरळी नाकामार्गे इच्छित स्थळी जावे.

पोलीस उपआयुक्त (मुख्यालय व मध्य विभाग), वाहतूक मुंबई डॉ. दिपाली घाटे यांनी शुक्रवारी (दि. ४) याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share