Skip to content

क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी

खेड तालुक्यात एका खाजगी कंपनीच्या आवारात मालवाहतूक करताना झाला भीषण अपघात

PG
Prashik Ghaste

1 min read

क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी

खेड तालुक्यात एका खाजगी कंपनीच्या आवारात मालवाहतूक करताना झाला भीषण अपघात

पिंपरी: खेड तालुक्यातील निघोजे येथील एका खाजगी कंपनीच्या आवारात क्रेनने मालवाहतूक करत असताना झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (१४ मे) दुपारी २:५० च्या सुमारास 'अँडेरिवा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीच्या आवारात घडली. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी क्रेन चालकाविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण शिवकुमार साकेत (१८) आणि त्याचा साथीदार सत्येंद्र श्रीनिवास साकेत (२१) हे कंपनीच्या आवारात काम करत होते. दोघेही क्रेनला जोडलेला जड लोखंडी अ‍ँगल साखळीच्या सहाय्याने पकडून एका दुकानातून दुसऱ्या दुकानात नेत होते. याच दरम्यान, आरोपी क्रेन चालक अंकितकुमार ओमप्रकाश मंजी (मूळ रा. बिहार, सध्या रा. म्हाळुंगे परिसर) याने क्रेन अत्यंत निष्काळजीपणे आणि वेगाने चालवली. अचानक क्रेनचे संतुलन बिघडल्याने सत्येंद्र साकेत खाली पडले आणि क्रेनचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. या अपघातात त्यांच्या कंबरेला आणि दोन्ही पायांना गंभीर फ्रॅक्चर झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Share