Skip to content

जास्त परताव्याचे आमिष दाखवून महिलेची पाच लाखांची फसवणूक

मुदत संपल्यानंतर परतावा आणि मूळ रक्कमही परत मिळाली नाही

PG
Prashik Ghaste

1 min read

जास्त परताव्याचे आमिष दाखवून महिलेची पाच लाखांची फसवणूक

मुदत संपल्यानंतर परतावा आणि मूळ रक्कमही परत मिळाली नाही

पिंपरी: गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ५ लाख १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्‍यात आली. ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे २१ ऑगस्‍ट २०२४ ते १२ मार्च २०२५ या कालावधीत घडली.

या प्रकरणात एका पीडित महिलेने शनिवारी (९ मे) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विनोद चौहान (चंदीगड, पंजाब) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद चौहान याने फिर्यादीला गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे प्रलोभन दिले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने ५ लाख १० हजार रुपये दिले. मात्र, मुदत संपल्यानंतर आरोपीने परतावा दिला नाहीच, उलट मूळ रक्कमही परत न देता फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Share