Pune Crime : व्हॉट्सअप स्टेटस ठेवण्यावरून १७ वर्षीय युवकाचा खून
Pune Crime : पुणे : व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवरील स्टेटस ठेवण्यावरून झालेल्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी १७ वर्षीय युवकाच्या डोक्यात हातोडीने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना कोथरूडमधील एआरएआय टेकडीवरील जंगलात घडली.
1 min read

Pune Crime : एआरएआय टेकडीवरील जंगलात हातोडीने डोक्यात वार; कोथरूड पोलिसांकडून दोघा अल्पवयीनांना ताब्यात
Pune Crime : पुणे : व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवरील स्टेटस ठेवण्यावरून झालेल्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी १७ वर्षीय युवकाच्या डोक्यात हातोडीने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना कोथरूडमधील एआरएआय टेकडीवरील जंगलात घडली. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला असून, या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.https://maharashtramirror.com/
नील विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरूड) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील विजय सखाराम नाईक (वय ४५) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नील आणि ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही अल्पवयीन एकाच परिसरात राहत होते. https://maharashtramirror.com/wp-admin
काही दिवसांपूर्वी संबंधित अल्पवयीन मुलांना मारहाण झाल्याच्या प्रकरणात ते कारागृहात गेले होते. या प्रकरणातील ओम साळुंके आणि सुशय शिरसाठ यांचे व्हॉट्सअॅप तसेच इन्स्टाग्रामवरील स्टेटस नीलने ठेवले होते. यावरून दोन्ही अल्पवयीन मुलांनी नीलला, “आपण एकाच वस्तीत राहतो. असे असताना आम्हाला मारहाण करून जेलमध्ये गेलेल्या व्यक्तींचे स्टेटस का ठेवतोस?” असा जाब विचारला. त्यातून मंगळवारी त्यांच्यात वाद झाला. वादानंतर काही वेळाने त्यांच्यात समेट झाल्याचे भासले. त्यानंतर दोन्ही अल्पवयीन नीलला सोबत घेऊन एआरएआय टेकडीवरील जंगलात गेले. तेथे पुन्हा वाद झाल्यानंतर दोघांनी हातोडीने नीलच्या डोक्यात वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या नीलचा त्यात मृत्यू झाला. Pune Crime
दरम्यान, बुधवारी सकाळी एआरएआय टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना जंगलात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना माहिती दिली. कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता युवकाच्या डोक्यावर गंभीर दुखापतीच्या खुणा आढळल्या. तपासादरम्यान मृताची ओळख नील नाईक अशी पटली. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही अल्पवयीनांना ताब्यात घेतले. व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवरील स्टेटस ठेवण्याच्या क्षुल्लक कारणातून वाद विकोपाला जाऊन १७ वर्षीय युवकाचा जीव गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड पोलिस करीत आहेत.


