Water Cut Newsपुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार ‘खडकवासला’तून पाण्याचा विसर्ग वाढवल्याची कारणे द्या
पुणे, महाराष्ट्र मिरर Water Cut News : पुण्यातील जनतेच्या डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार असताना शुक्रवारी (दि.
1 min read

सजग नागरिक मंचाची मागणी
पुणे, महाराष्ट्र मिरर Water Cut News : पुण्यातील जनतेच्या डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार असताना शुक्रवारी (दि. १७) खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यात सोडले जाणारे पाणी ७०० क्युसेक्स वरून १००० क्युसेक्स पर्यंत कशासाठी वाढवले याची कारणे मुख्य अभियंता, जलसंपदा पुणे विभाग यांनी जाहीर करावीत, अशी मागणी सजग नागरिक मंचने केली आहे.Water Cut News

याबाबत मंच चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले की, जुलै मध्ये पाऊस सुरु झाल्यानंतर खडकवासला धरण भरत आल्यावर जलसंपदा विभागाने मुठा उजव्या कालव्यात पाणी सोडायला सुरुवात केली. ७ जुलै रोजी ५०० क्युसेक्स ने , ८ व ९ जुलै रोजी ७०० क्युसेक्स ने, १० जुलै रोजी ३५० क्युसेक्सने तर ११ ते १६ जुलै रोज ७०० क्युसेक्स ने मुठा उजव्या कालव्यात पाणी सोडले गेले , आज अचानकपणे हे वाढवून १००५ क्युसेक्स ने मुठा उजव्या कालव्यात पाणी सोडायला सुरुवात केली आहे. Water Cut News

पालख्या ही पुणे जिल्ह्यातून पुढे गेल्या आहेत. अकरा दिवस दररोज ७०० क्युसेक्स ने कालव्यात सोडलेल्या पाण्यामुळे दौंडला पाणीपुरवठा करणारा तलावही भरला असणे अपेक्षित असताना आज अचानक हा कालव्यातील विसर्ग तीस टक्के ने वाढवायचे कारण काय ? या निर्णयामुळे पुण्यातील जनता बाधीत होणार असल्याने माहिती अधिकार कायदाप्रमाणे या निर्णयामागची वस्तुस्थिती आणि कारणे स्वतः हून घोषित करणे बंधनकारक आहे. त्यामुळे याबाबत जलसंपदा विभागाने पुणेकरांना स्पष्टीकरण द्यावे अशी त्यांनी मागणी केली आहे
Water Cut News


