Skip to content

सार्वजनिक वास्तूंच्या नामकरणासाठी कायदेशीर लढाईचा इशारा

नगरसेवकांच्या कुटुंबीयांची नांवे देण्याला विरोध; सामाजिक कार्यकर्त्यांची सह्यांची मोहीम

PG
Prashik Ghaste

1 min read

नगरसेवकांच्या कुटुंबीयांची नांवे देण्याला विरोध; सामाजिक कार्यकर्त्यांची सह्यांची मोहीम

निलेश राऊत
पुणे : सार्वजनिक जागांवरील वास्तूंना नगरसेवकांच्या कुटुंबीयांचे नाव देण्याला विरोध करत, २००० साली बनवलेला नियम पुन्हा लागू करा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर या मुद्द्यावर कायदेशीर लढाई लढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

बाणेर येथील महापालिकेच्या रुग्णालयाला एका नगरसेवकाने वडिलांचे नाव देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला नागरिकांनी विरोध केल्याने तो थांबवण्यात आला. मात्र, हा एकच प्रसंग नसून, महापालिकेच्या सार्वजनिक बागा, शाळा, रुग्णालये, पूल आणि इतर सार्वजनिक जागांना नगरसेवकांच्या नातेवाइकांची नावे देण्याची चुकीची प्रथा पाडली जात आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.

२००० मध्ये मंजूर केलेला ठराव
सार्वजनिक जागांना राष्ट्रीय नेते, समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांची नावे द्यावीत, असा ठराव पुणे महापालिकेच्या नगरसेवकांनी २००० मध्ये मंजूर केला होता. परंतु या नियमाला हरताळ फासत अनेक ठिकाणी नगरसेवकांच्या कुटुंबीयांची नावे देण्यात आली आहेत. शिवाय हा ठरावच नगरसेवकांनी रद्द केला आहे. त्यामुळे तो पुन्हा लागू करावा, अन्यथा याचिका दाखल करू अशा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

Share