Pune News : वारजेतील आरोग्य निरीक्षक सचिन सावंत चर्चेत; कचऱ्याची गाडी पुन्हा डोमिनोज हॉटेलबाहेर आढळली
Pune News : पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३२ मधील वारजे परिसरात आरोग्य निरीक्षक सचिन सावंत यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत असलेली कचऱ्याची गाडी पुन्हा चर्चेत आली आहे.
1 min read

Pune News : चार दिवसांपूर्वीही याच गाडीचा मुद्दा उपस्थित; चालक गायब असल्याचा दावा, उपायुक्त वारुळे यांच्या कारवाईकडे वारजेकरांचे लक्ष
Pune News : पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३२ मधील वारजे परिसरात आरोग्य निरीक्षक सचिन सावंत यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत असलेली कचऱ्याची गाडी पुन्हा चर्चेत आली आहे. चार दिवसांपूर्वीही हीच गाडी वारजे परिसरात आढळल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी या प्रकरणात सचिन सावंत यांचे नाव समोर आल्याचा दावा करण्यात आला होता.https://maharashtramirror.com/ Pune News
आज पुन्हा ही गाडी डोमिनोज हॉटेलच्या बाहेर आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, गाडीचा चालक घटनास्थळी नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या गाडीचा वापर नेमका कोण करत आहे आणि यासंदर्भात महापालिका प्रशासन काय भूमिका घेणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
उपायुक्त वारुळे यांच्या भूमिकेकडे लक्ष
या प्रकरणावरून वारजे परिसरातील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित केला आहे. उपायुक्त वारुळे यांनी या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वारंवार एकाच गाडीचा मुद्दा समोर येत असताना महापालिका प्रशासन याची दखल घेणार का, तसेच संबंधित प्रकरणात नेमकी कोणती कारवाई केली जाणार, याकडे वारजेकरांचे लक्ष लागले आहे.


