Pune Crime :चांगल्या परताव्याच्या आमिषाने अकरा कोटींची फसवणूक
Pune Crime पिंपरी, महाराष्ट्र मिरर: वाकड येथील व्हाईट स्क्वेअर ऑफिसमध्ये विविध कंपन्यांमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ११ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
1 min read

Pune Crime : वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Pune Crime पिंपरी, महाराष्ट्र मिरर: वाकड येथील व्हाईट स्क्वेअर ऑफिसमध्ये विविध कंपन्यांमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ११ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका दाम्पंत्यावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune crime
सचिन चंद्रकांत साळुंखे (वय ३७), श्वेता सचिन साळुंखे (वय ३५, दोघे रा. पिंपळे निलख) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दीपक दत्तात्रेय बर्गे (वय ४०, भुगाव, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली.https://maharashtramirror.com/ Pune crime
तक्रारीनुसार, आरोपींनी स्वतः कॅफेचे मालक असल्याचे सांगून फिर्यादी आणि त्यांच्या साथीदारांना विविध कंपन्यांत गुंतवणुकीवर इक्विटी शेअर्स आणि चांगल्या परताव्याचे आश्वासन दिले. त्यांच्यावर विश्वास ठेवून एकूण ११ कोटी ६७ लाख ७ हजार रुपयांची गुंतवणूक केली. आरोपींनी या रकमेचा अपहार करून कोणतीही रक्कम परत न करता फसवणूक केली. ही घटना ११ मे २०२५ ते २ सप्टेंबर २०२६ दरम्यान घडली. वाकड पोलीस तपास करत आहेत.


