Skip to content

Pune Crime : बनावट ट्रेडिंगद्वारे तरूणाची ४२ लाखांची फसवणूक

Pune Crime पिंपरी, महाराष्ट्र मिरर: ‘ट्रेड एक्स’ नावाच्या बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एका तरुणाची ४२ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना वाकड परिसरात घडली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

बनावट ट्रेडिंगद्वारे तरूणाची ४२ लाखांची फसवणूक वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बनावट ट्रेडिंगद्वारे तरूणाची ४२ लाखांची फसवणूक वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime : वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime पिंपरी, महाराष्ट्र मिरर: ‘ट्रेड एक्स’ नावाच्या बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एका तरुणाची ४२ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना वाकड परिसरात घडली. ही घटना १३ ऑगस्ट २०२५ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. सुनील अंतु दवंगे (वय २९, वाकड, मुळ रा. कोपरगाव, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली.https://maharashtramirror.com/ Pune crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला मोबाईलवर कॉल करून ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीस सांगण्यात आले. त्यांनी टप्प्याटप्प्याने ४२ लाख ४३ हजार रुपये गुंतवले. रक्कम परत मागितली असता डमी प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक शून्य दाखवण्यात आली. सेबीच्या संकेतस्थळावर तपासले असता ती कंपनी नोंदणीकृत नसल्याचे उघड झाले. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Share