Viman Nagar : विमान नगरमधील महापालिकेच्या 'स्मार्ट' कारभाराचे धिंडवडे
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 min read

Viman Nagar : अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे आरोग्य टांगणीला
पुणे, महाराष्ट्र मिरर
Viman Nagar : पुण्यातील अत्यंत उच्चभ्रू, आयटी पार्क आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा 'व्ही.आय.पी.' परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमान नगरची सध्या महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे पुरती दुरवस्था झाली आहे. ज्या परिसराच्या नावावर पुणे महानगरपालिका 'स्मार्ट सिटी'च्या वल्गना करते, त्याच भागातील मुख्य रस्त्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून साचलेले ड्रेनेजचे पाणी साठल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांध्ये संतापाची लाट उसळली असून करदात्या नागरिकांच्या जिवाशी खेळणे हा पुणे महानगरपालिकेचा स्थायीभाव बनला आहे का? असा उद्विग्न सवाल उपस्थित केला जात आहे. Viman Nagar PMC Drainage Issue

नगर रोड, विमानतळ रस्ता (सर्व्हे नं. २३५, सनसेट बुलेवर्ड रोड) आणि सिम्बायोसिस चौकातील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून साचलेले ड्रेनेजचे दूषित पाणी आणि पावसाचा चिखल यामुळे या संपूर्ण परिसराला अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने हे पाणि तिथेच साठून राहत आहे. हा मार्ग सिम्बायोसिस कॉलेज आणि नागरि सोसायट्यांना जोडणारा मुख्य मार्ग असल्यामुळे लाखो नागरिकांची याच ड्रेनजच्या पाण्यातून येजा होत असते. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या बाता मारणाऱ्या महापालिकेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे हा अतिशय व्ही.आय.पी. आणि उच्चभ्रू मानला जाणारा परिसर आज रोगराईच्या छायेखाली आला आहे. Viman Nagar
Pune News : ‘स्मार्ट सिटी’ पुण्याच्या वेशीवर चिमुकल्यांचा जीवघेणा प्रवास

दररोज हजारो नागरिक, लहान मुले, सिम्बायोसिस मधील विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, तुंबलेल्या ड्रेनेजमुळे संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोसारख्या संसर्गजन्य आजारांची साथ पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. Viman Nagar
PMC WATER NEWS : पुण्यातील काही भागात गुरूवारी पाणी पुरवठा बंद
साचलेले काळेकुट्ट पाणी आणि खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून किरकोळ व गंभीर अपघातांना बळी पडत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घाण पाणी साचल्याने पादचाऱ्यांना चालणेही अशक्य झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या आरोग्य आणि ड्रेनेज विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. Viman Nagar
पुणे पँथर सेनेचा आक्रमक पवित्रा
नागरिकांच्या या गंभीर समस्येला वाचा फोडण्यासाठी अखेर पुणे पँथर सेना मैदानावर उतरली आहे. संघटनेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ (लोहगाव-विमाननगर) चे लोकप्रतिनिधी तसेच नगर रोड - वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे लेखी व ऑनलाइन तक्रार अर्ज सादर करून प्रशासनाचे कान उपटण्यात आले आहेत.

३ दिवसांचा अल्टिमेटम
सिम्बायोसिस चौकाजवळील तुंबलेली मुख्य ड्रेनेज लाईन २४ ते ७२ तासांत साफ करून पावसाच्या पाण्याचा सुयोग्य निचरा करावा. परिसरात जंतूनाशक औषध फवारणी व स्वच्छता मोहीम तात्काळ राबवण्यात यावी. अशी मागणी करत पुढील तीन दिवसांच्या आत हा रस्ता पूर्णपणे स्वच्छ झाला नाही आणि ड्रेनेजचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला नाही, तर पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर अतिशय तीव्र व आक्रमक आंदोलन करण्यात येईल. तसेच, विमान नगरच्या रस्त्यावर साचलेले हेच दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी घागरींमध्ये भरून पालिका अधिकाऱ्यांच्या दालनात व टेबलवर ओतून निषेध नोंदवला जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.Viman Nagar
https://www.instagram.com/reel/DbDI3jJIO7x/?igsh=MW5zN2ZhbjZyNTNoaQ==


