Skip to content

Vasai Police News : पुण्यात अध्यात्माच्या नावाखाली महिलेवर बलात्कार; स्वतःला 'शंकराचा अवतार' सांगणारा भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य फरार

Vasai Police Latest News : वसईत पोलिसांची धाड, पण आरोपी निसटला; 'तू माझी पार्वती आहेस' म्हणत गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप

V
Vivek

1 min read

Pune sexual assault case, Kondhwa crime news, courier boy assault Pune, woman attacked in apartment, Pune techie assault, Kondhwa police investigation, fake courier delivery crime, Pune woman safety issue, Maharashtra assault cases

Vasai Police Latest News : वसईत पोलिसांची धाड, पण आरोपी निसटला; 'तू माझी पार्वती आहेस' म्हणत गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप

वसई :- नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच, अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या आणखी एका भोंदू बाबाचे कारस्थान उघडकीस आले आहे. स्वतःला 'शंकराचा अवतार' भासवून 35 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला ऋषिकेश वैद्य हा सध्या फरार झाला आहे. पोलिसांनी वसईतील त्याच्या निवासस्थानी धाड टाकली, मात्र त्यापूर्वीच त्याने पळ काढला असून आता पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

सोशल मीडियावरून जाळे आणि 'अवतारा'चा बनाव

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 2023 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषिकेश वैद्यने तिच्याशी ओळख वाढवली. त्याने स्वतःला 'शंकराचा अवतार' असल्याचे सांगितले आणि पीडितेला "तू पूर्वजन्मीची माझी पार्वती आहेस," असे भासवून तिचा विश्वास संपादन केला. अध्यात्मिक साधनेच्या बहाण्याने त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढले.

पुण्यात अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचा सिलसिला

तक्रारीत नमूद केल्यानुसार, ऋषिकेशने पीडितेला पुण्यात एका लॉजवर बोलावले. तिथे तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता, त्याने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले. या पुराव्यांच्या जोरावर तो 2025 पर्यंत तिला ब्लॅकमेल करत राहिला. वसईतही त्याने पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

'झिरो नंबर'ने गुन्हा दाखल आणि पोलिसांची कारवाई

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणातील खुलासे पाहिल्यानंतर पीडितेने हिंमत एकवटली आणि आपल्या पतीला हा सर्व प्रकार सांगितला. बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात 'झिरो नंबर'ने गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडल्याने हे प्रकरण आता पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

आरोपी फरार, पुरावे नष्ट होण्याची भीती

गुन्हा दाखल झाल्याचे समजताच ऋषिकेश वैद्य मोबाईल बंद करून फरार झाला आहे. गुरुवारी रात्री पोलिसांनी त्याच्या वसईतील घरावर धाड टाकली, पण तो तिथे सापडला नाही. आरोपीला फरार होण्यासाठी वेळ मिळाल्याने तो आपल्या मोबाईलमधील महत्त्वाचे तांत्रिक पुरावे नष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे पोलिसांचे एक विशेष पथक आता वसई-विरार परिसरात त्याच्या मागावर आहे.

Share