Skip to content

Mumbai news : वंदे भारत फ्रेट ईएमयूची चाचणी; १३० किमी प्रतितास वेग

Mumbai news : मुंबई : देशातील पहिल्या वंदे भारत फ्रेट ईएमयू रेकची मुंबई-अहमदाबाद मार्गावर १३० किमी प्रतितास वेगाने शनिवारी चाचणी घेण्यात आली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

वंदे भारत फ्रेट ईएमयूची चाचणी; १३० किमी प्रतितास वेग
वंदे भारत फ्रेट ईएमयूची चाचणी; १३० किमी प्रतितास वेग

Mumbai news : मुंबई-अहमदाबाद मार्गावर आरडीएसओकडून चाचणी; वेग, स्थिरता आणि कार्यक्षमतेची तपासणी

Mumbai news : मुंबई : देशातील पहिल्या वंदे भारत फ्रेट ईएमयू रेकची मुंबई-अहमदाबाद मार्गावर १३० किमी प्रतितास वेगाने शनिवारी चाचणी घेण्यात आली. रेल्वेच्या संशोधन, अभिकल्प व मानक संघटनेने (आरडीएसओ) अहमदाबाद-वडोदरा-मुंबई सेंट्रल मार्गावर कन्फर्मेटरी ऑसिलोस्कोप कार रन (सीओओआर) चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान वंदे भारत फ्रेट रेकची अधिक वेगाने धावण्याची क्षमता, स्थिरता आणि कार्यक्षमता तपासण्यात आली.https://maharashtramirror.com/ Mumbai news

हा रेक साबरमती येथील आयसीडीमध्ये ठेवण्यात आला होता. आरडीएसओच्या पथकाने अहमदाबाद विभागातील यांत्रिक, विद्युत तसेच सिग्नल व दूरसंचार विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेकमध्ये विविध सेन्सर आणि डेटा नोंदविणारी यंत्रणा बसवली.https://maharashtramirror.com/ Mumbai news

सकाळी नऊ वाजता हा रेक अहमदाबादहून मुंबई सेंट्रलकडे रवाना झाला. पश्चिम रेल्वेने चाचणीसाठी आवश्यक मार्ग उपलब्ध करून दिला. चाचणीदरम्यान रेकमध्ये ५० टक्के पॉवर लोडिंग आणि २०.३२ टन अॅक्सल लोड असलेली बोगी वापरण्यात आली.

१३० किमी प्रतितास वेगाची चाचणी


चाचणीसाठी १३० किमी प्रतितास वेगाने वंदे भारत चालविण्याचा अनुभव असलेले चालक पथक, गार्ड, मुख्य लोको निरीक्षक, वाहतूक निरीक्षक आणि कायमस्वरूपी मार्ग निरीक्षक तैनात करण्यात आले होते. तसेच सी अँड डब्ल्यू आणि सिग्नल व दूरसंचार विभागाचे कर्मचारीही रेकसोबत उपस्थित होते.

आयसीएफ, मेधा आणि अन्य संबंधित संस्थांचे तांत्रिक कर्मचारी संभाव्य बिघाड हाताळण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले होते. चाचणीपूर्वी रेकची सर्व तांत्रिकदृष्ट्या तपासणी करून तो धावण्यासाठी योग्य असल्याची खात्री करण्यात आली.

या चाचणीदरम्यान महागडी तांत्रिक उपकरणे बसविण्यात आल्याने अहमदाबाद आणि मुंबई सेंट्रल स्थानकांवर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. या चाचणीमुळे वंदे भारत फ्रेट ईएमयूच्या वेगवान आणि सुरक्षित मालवाहतुकीच्या क्षमतेची पडताळणी करण्यास महत्त्वपूर्ण मदत होणार आहे.

Share