Pune News : उंड्री-कोंढव्यात रस्त्यांची दुरवस्था, अवजड वाहतुकीमुळे जिवाला धोका
Pune News : पुणे: पुण्यातील दक्षिण-पूर्व भागात वाढत्या रस्ते अपघातांवर चिंता व्यक्त करत उंड्री, पिसोळी, महंमदवाडी, येवलेवाडी आणि कोंढवा परिसरातील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
2 min read

Pune News : स्थानिक रहिवाशांचे पोलीस आयुक्तांना साकडे
Pune News : पुणे: पुण्यातील दक्षिण-पूर्व भागात वाढत्या रस्ते अपघातांवर चिंता व्यक्त करत उंड्री, पिसोळी, महंमदवाडी, येवलेवाडी आणि कोंढवा परिसरातील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परिसरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी करत नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले.https://maharashtramirror.com/ Pune News
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सदस्य तसेच सैनिक मित्र परिवार आणि कर्तव्य धर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक केशव मेंधळे आणि शीख हेल्पलाईन फाउंडेशनचे संस्थापक राज सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News
प्रशासनाच्या भोंगळ कारभार
गेल्या काही महिन्यांत या भागात अनेक भीषण रस्ते अपघात झाले असून, प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. विशेषत: २१ सप्टेंबर रोजी महंमदवाडी येथील रहेजा विस्टा प्रीमियर सोसायटीबाहेर झालेल्या भीषण अपघाताची घटना ही ताजीच आहे. या दुर्घटनेत २० वर्षीय इब्राहिम सरकार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र कैस मोहम्मद खान गंभीर जखमी झाला. अपघातानंतर रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याबद्दलही नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अपघातांचा धोका वाढला
रहवासी आणि दाट लोकवस्तीच्या भागातून पाण्याची टँकर्स, डंपर, सिमेंट मिक्सर आणि बांधकामाचे साहित्य घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनांच्या बेसुमार वाहतुकीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय वाहतूक पोलिसांची अपुरी नियुक्ती, बेदरकारपणे गाड्या चालवणे, अतिवेग, अपुरे वाहतूक सिग्नल व इशारे फलक, गतिरोधकांचा अभाव, रस्त्यांवरील अवैध पार्किंग आणि खोदकाम करून तसेच सोडलेले रस्ते यांमुळे अपघातांचा धोका वाढल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
अवजड वाहनांचीच्या वाहतुकीला मर्यादा घाला
निवासी भागातून अवजड वाहनांची वाहतूक मर्यादित करून ती फक्त दुपारी २ ते ४ आणि रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेतच ठेवण्यात यावी. एनआयबीएम चौकापासून कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर P1/P2 पार्किंग आणि 'नो पार्किंग' क्षेत्रांची कडक अंमलबजावणी करावी.
गृहनिर्माण सोसायट्यांना पाणी पुरवठा करताना टँकर सार्वजनिक रस्त्यावर उभे करून रस्त्यावरून पाइप टाकले जातात. हे टँकर सोसायटीच्या आवारात उभे करून पाइपलाइन अंतर्गत भागातूनच टाकण्याची सक्ती करावी. अपघातप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करून तेथे स्पीड ब्रेकर्स, रमबल्स, सीसीटीव्ही कॅमेरे आणि योग्य ते वाहतूक चिन्ह बसवावेत. तसेच अतिरिक्त वाहतूक पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन तैनात करावेत. अशा मागण्या यावेळी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत
रहेजा सर्कलजवळ पोलीस चौकीची मागणी
वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेता, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहेजा सर्कलजवळ नवीन पोलीस चौकी आणि समर्पित वाहतूक पोलीस केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी विकासकांनी पालिकेला दिलेल्या मोकळ्या जागांची पाहणी करून योग्य जागेची निवड करण्याची सूचना रहिवाशांनी केली आहे.
तसेच, प्रभाग ४१ मधील ब्लॅक स्पॉट्स (अपघातप्रवण क्षेत्रे) शोधण्यासाठी महापालिका अधिकारी, रस्ते विभाग, वाहतूक सल्लागार, पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची संयुक्त समिती स्थापन करून पाहणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पुणे पोलीस आणि महापालिकेने तात्काळ समन्वयाने पावले उचलून जीवितहानी रोखावी, असे आवाहन रहिवाशांनी केले आहे.


