Skip to content

Unauthorized Construction Demolished : औंध-बाणेर परिसरातील १८,००० चौरस फूट अनधिकृत कच्चे-पक्के बांधकाम जमीनदोस्त

कारवाईत पुणे मनपा पोलीस कर्मचारी-०५, एम.एस.एफ.

DJ
Dattatraya Jadhav

1 min read

18,000 Square Feet of Unauthorized Construction—Both Temporary and Permanent—Demolished in the Aundh-Baner Area.
aundh baner 2

कारवाईत पुणे मनपा पोलीस कर्मचारी-०५, एम.एस.एफ. जवान-२५, जेसीबी ३, गॅसकटर- २, ब्रेकर- २, बिगारी सेवक-४० यांचा सहभाग

पुणे, एप्रिल ७, निलेश राऊत :
औंध-बाणेर परिसरातील अभिमान सोसायटी, सर्जा हॉटेल लेन, रिलायन्स फ्रेश, सिग्नेचर व कोंढवा बुद्रुक येथे सोमवारी ( दि. ६ एप्रिल) अनधिकृत बांधकाम निर्मुलन कारवाई सुरु करण्यात आली. सदर कारवाईकरिता बांधकाम निर्मुलन विभागाने तब्बल १८,००० चौरस फूट अनधिकृत कच्चे-पक्के बांधकाम जमीनदोस्त केले.


सदर कारवाईत पुणे मनपा पोलीस कर्मचारी-०५, एम.एस.एफ. जवान-२५, जेसीबी ३, गॅसकटर- २, ब्रेकर- २, बिगारी सेवक-४० यांचा सहभाग होता. महापालिका आयुक्त यांचे आदेशानुसार उप आयुक्त, अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग सोमनाथ बनकर, मुख्य सुरक्षा अधिकारी तथा सहाय्यक अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मलन विभाग प्रमुख डॉ. रमेश शेलार, यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई झाली. यात विजय पाटील, किरण देसले, विरेंद्र टिळेकर, विक्रम क्षिरसागर कनिष्ठ अभियंता बांधकाम विकास विभाग रंजित मुटकुले उप अभियंता बांधकाम विकास विभाग आदी उपस्थित होते.

18,000 Square Feet of Unauthorized Construction—Both Temporary and Permanent—Demolished in the Aundh-Baner Area.

Share