Ulhasnagar Crime News : ४ दिवसांपासून चिमुकली बेपत्ता, पोलिसांना झाडां-झुडपात भयंकर आढळलं; ३ वर्षीय चिमुकलीसोबत काय घडलं?
Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडा-झुडपांत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
2 min read

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह झाडा-झुडपांत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे.
उल्हासनगर : उल्हासनगरात एका ३ वर्षीय चिमुकलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. old girl missing found dead in Ulhasnagar हिललाईन पोलीस स्टेशनच्या Hill Line Police Station मागील प्रेमनगर टेकडी परिसरात हा मृतदेह सापडला आहे. या घटनेनंतर परिसरातून आरोपीचा शोध घेऊन त्याला फाशी देण्याची मागणी करत स्थानिकांनी हिललाईन पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला.
नेमकं काय घडलं?
एक महिला प्रेमनगर टेकडीवर तिच्या ३ मुलींसह राहते. १८ नोव्हेंबर रोजी ही महिला डॉक्टरकडे जात असताना तिची एक मुलगी बेपत्ता झाली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिने याबाबत बेपत्ता प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. महिलेच्या तक्रारीनंतर हिललाईन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तक्रार दाखल केल्यानंतर ३ दिवसांनी गुरुवारी २१ नोव्हेंबर रोजी प्रेमनगर टेकडीवरील झाडा-झुडपांच्या परिसरात एका मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवला. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेत पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आता जळालेल्या अवस्थेतील मृतदेह त्या चिमुकलीचा आहे का याचा तपास सुरू आहे.हा मृतदेह तीन वर्षीय बेपत्ता झालेल्या मुलीचा आहे का? चिमुकलीसोबत दुष्कृत्य करण्यात आलं का? की केवळ हत्या झाली आहे? या संपूर्ण घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांकडून तपास सुरू असला, तरी डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी समोर येतील, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.या घटनेनंतर या परिसरात ज्या आरोपीने चिमुकलीला अशाप्रकारे संपवलं, त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. बेपत्ता झालेल्या मुलीच्या आईसह तेथील स्थानिकांनी हिललाईन पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. तर परिसरातील महिलांनी चिमुकलीला न्याय देण्याची मागणी करत या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
- #Mumbai
- #Post-mortem report missing girl
- #Thane Crime News
- #Hill Line police station
- #Latest Crime News
- #CCTV footage
- #Ulhasnagar Crime News
- #ulhasnagar
- #Missing girl found dead
- #Mumbai News headlines
- #Maharashtra
- #Three-year-old girl missing Ulhasnagar
- #Crime News
- #Thane police
- #Today news
- #Thane in Maharashtra
- #Half burnt body of three-year-old
- #Latest local news
- #Child abduction case Ulhasnagar
- #Ulhasnagar locals demand justice
- #latest breaking news
- #Ulhasnagar Police
- #Prem Nagar Ulhasnagar
- #Maharashtra Crime News
- #News headlines
- #Mumbai News
- #Today news headlines
- #Ulhasnagar News
- #news
- #Child body dump yard
- #Ulhasnagar Hill Line police station
- #Dump yard
- #Thane district in Maharashtra
- #Mumbai Crime News
- #Ulhasnagar Deputy Commissioner Sachin Gore
- #Mumbai news today
- #Red dress girl missing
- #Breaking News
- #Ulhasnagar police investigation
- #National news
- #Latest national news
- #Latest online news
- #Mumbai news updates
- #Mumbai Daily News
- #Online news
- #News of the day
- #Crime against children in Ulhasnagar


