Skip to content

Solapur News : उजनीवरील चारही प्रकल्पांना संजयमामा शिंदे यांचा कडाडून विरोध ; शेती, मत्स्यव्यवसाय आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता; तातडीने जनसुनावणी घेण्याची मागणी

Solapur News : सोलापूर : उजनी धरणावर प्रस्तावित करण्यात आलेल्या तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा सेंटर आणि लघु मॉड्युलर अणुभट्टी या चारही प्रकल्पांना करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

उजनीवरील चारही प्रकल्पांना संजयमामा शिंदे यांचा कडाडून विरोध ; शेती, मत्स्यव्यवसाय आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता; तातडीने जनसुनावणी घेण्याची मागणी
उजनीवरील चारही प्रकल्पांना संजयमामा शिंदे यांचा कडाडून विरोध ; शेती, मत्स्यव्यवसाय आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता; तातडीने जनसुनावणी घेण्याची मागणी

Solapur News : सोलापूर : उजनी धरणावर प्रस्तावित करण्यात आलेल्या तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा सेंटर आणि लघु मॉड्युलर अणुभट्टी या चारही प्रकल्पांना करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिक शेती, मत्स्यव्यवसाय आणि पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करता, शासनाने या प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.https://maharashtramirror.com/Solapur News

भीमाशंकरजवळील अभयारण्यात टोरंट हायड्रो पॉवरच्या प्रकल्पासाठी प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध होत असतानाच, उजनी धरणावरील या चार प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या उपजीविकेवर आणि पर्यावरणावर काय परिणाम होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रकल्पांचे फायदे आणि परिणाम स्पष्ट करा


उजनी धरणावरील प्रस्तावित प्रकल्पांची पाण्याची नेमकी गरज किती असेल, त्यातून कोणते फायदे मिळणार आहेत आणि स्थानिक शेती, मासेमारी तसेच पर्यावरणावर कोणते परिणाम होऊ शकतात, याची सविस्तर माहिती शासनाने जनतेसमोर मांडावी. तसेच या प्रकल्पांबाबत तातडीने जनसुनावणी घेऊन शेतकरी, मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांची मते जाणून घ्यावीत, अशी मागणी संजयमामा शिंदे यांनी केली आहे.

शेतकरी आणि मच्छीमारांची बैठक


या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी नगोर्ली येथे करमाळा, माढा आणि इंदापूर तालुक्यांतील शेतकरी व मच्छीमारांची बैठक पार पडली. उजनी धरणावर अवलंबून असलेल्या शेती आणि मत्स्यव्यवसायाच्या भवितव्याच्या दृष्टीने या प्रकल्पांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

उजनी धरण हे परिसरातील शेती, पाणीपुरवठा आणि मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने, येथील नैसर्गिक संसाधनांचा वापर करणाऱ्या कोणत्याही मोठ्या प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या चिंता दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने सर्व संबंधित घटकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका संजयमामा शिंदे यांनी घेतली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share