Skip to content

Mumbai News : ३१ हजार कोटींच्या पॅकेजचे काय झाले? उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल

Mumbai News : मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, खरीप पिकांचे झालेले नुकसान आणि सरकारच्या पाहणी दौऱ्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

३१ हजार कोटींच्या पॅकेजचे काय झाले? उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल
३१ हजार कोटींच्या पॅकेजचे काय झाले? उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल

Mumbai News : मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, खरीप पिकांचे झालेले नुकसान आणि सरकारच्या पाहणी दौऱ्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या ३१ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा हिशोब सरकारने जनतेसमोर मांडावा, अशी मागणी त्यांनी केली. https://maharashtramirror.com/ Mumbai News

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी मराठवाड्यासह राज्यातील काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा उल्लेख केला. त्यावेळी सरकारने खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत जाहीर केली होती. मात्र, या ३१ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी प्रत्यक्षात किती निधी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला, याची माहिती सरकारने महाराष्ट्राला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. https://maharashtramirror.com/ Mumbai News

यंदाच्या हंगामात दुष्काळाची शक्यता आधीपासून व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे सरकारने परिस्थितीचा अंदाज घेऊन दुष्काळ निवारणासाठी कोणती पावले उचलली, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. सध्याच्या परिस्थितीत पाऊस झाला तरी करपलेल्या पिकांना त्याचा फारसा फायदा होणार नाही, असे ते म्हणाले.

खरीप हंगाम हातातून गेल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून कर्जाचा भार वाढत असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. आता किमान जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा आणि आगामी रब्बी हंगामासाठी पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यांवरही ठाकरे यांनी टीका केली. बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदतीची आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्ष मदत किती मिळते, याचा प्रश्न कायम असल्याचे त्यांनी म्हटले. केवळ पाहणी दौरे आणि आश्वासने देऊन दुष्काळाचा प्रश्न सुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिवसेनेच्या वतीने ‘तुमसे ना हो पायेगा’ या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले जात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share