Satara News : 'उदयनराजे भोसले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध; 'छत्रपतींच्या गादीचा सन्मान' राखत विरोधकाची माघार!'
Satara News सातारा :- राज्यात एकीकडे विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच, दुसरीकडे सहकार क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
1 min read

Satara News : 'सहकाराचे राजकारण नको, शेतकरी अन् कष्टकऱ्यांचा उत्कर्ष हाच उद्देश'; बिनविरोध निवडीनंतर खासदार उदयनराजेंची पहिली आक्रमक प्रतिक्रिया!
Satara News सातारा :- राज्यात एकीकडे विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच, दुसरीकडे सहकार क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (SDCC) निवडणुकीत पहिला गुलाल उधळला गेला असून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. गृहनिर्माण आणि दूध संस्था मतदारसंघातून उदयनराजेंच्या विरोधात अर्ज दाखल केलेले उमेदवार ज्ञानेश्वर पवार यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने उदयनराजेंचा विजय सुकर झाला.https://maharashtramirror.com/ Satara News :
या ऐतिहासिक बिनविरोध निवडीनंतर सातारामधील 'जलमंदिर पॅलेस' येथे उदयनराजे समर्थकांनी तुफान जल्लोष करत त्यांचे फुलांचे गुच्छ देऊन जंगी स्वागत केले. सातारा जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागांसाठी 236 पैकी 224 अर्ज वैध ठरले असले, तरी उदयनराजेंच्या या बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी मिळाली आहे.https://maharashtramirror.com/ Satara News
'छत्रपतींच्या गादीचा सन्मान म्हणून माघार'
उदयनराजेंच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणारे ज्ञानेश्वर पवार यांनी अर्ज मागे घेताना अत्यंत भावूक विधान केले. "छत्रपतींच्या पावन गादीचा सन्मान, आदर आणि निष्ठा राखण्यासाठीच मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या शर्यतीतून माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे," असे सांगत त्यांनी उदयनराजेंच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला.
'बँका लिक्विडेशनमध्ये जाण्याचे मूळ कारण राजकारण; उदयनराजेंचा घणाघात'
बिनविरोध निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. उदयनराजे भोसले यांनी सहकार क्षेत्रातील राजकारणावर जोरदार प्रहार केला. उदयनराजे म्हणाले:
सहकाराचा विसर: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमधील आणि तालुक्यांतील सहकारी संस्था केवळ राजकीय स्वार्थामुळे लिक्विडेशनमध्ये (अवसायानात) निघाल्या आहेत. सहकार चळवळ ही 'लोकांनी लोकांसाठी' चालवण्याचे तत्त्व आता बाजूला पडत चालले आहे.
पदाची अपेक्षा नाही: सातारा जिल्हा बँक ही उत्तम कामगिरी करत असून तिने अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. इतर बँकांसारखी तिची दयनीय अवस्था होऊ नये. मला या बँकेत कोणत्याही पदाचा किंवा वैयक्तिक स्वार्थाचा मोह नाही.
शेतकऱ्यांची सेवा हेच ध्येय: शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील उपेक्षित घटकांचा विकास आणि उत्कर्ष व्हावा, हीच माझी या निवडणुकीमागील मुख्य भूमिका आहे.
दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकांच्या निवडणुका पुढे ढकलायच्या की नाही, या प्रश्नावर उत्तर देताना "हा संपूर्णपणे शासनाचा अधिकार असून शासन पातळीवरच याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल," असे स्पष्टीकरण उदयनराजेंनी दिले.


