Skip to content

Mumbai News : पान-मसाला जाहिरातींवर मुंढेंचा सेलिब्रिटींना सवाल ‘उत्पादन चांगले असेल तर आधी स्वतः आणि कुटुंबाने वापरा’; जाहिरातींबाबत FDA आयुक्तांची कठोर भूमिका

Mumbai News : मुंबई : पान-मसाला आणि गुटख्याशी साम्य असलेल्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

पान-मसाला जाहिरातींवर मुंढेंचा सेलिब्रिटींना सवाल ‘उत्पादन चांगले असेल तर आधी स्वतः आणि कुटुंबाने वापरा’; जाहिरातींबाबत FDA आयुक्तांची कठोर भूमिका
पान-मसाला जाहिरातींवर मुंढेंचा सेलिब्रिटींना सवाल ‘उत्पादन चांगले असेल तर आधी स्वतः आणि कुटुंबाने वापरा’; जाहिरातींबाबत FDA आयुक्तांची कठोर भूमिका

Mumbai News : मुंबई : पान-मसाला आणि गुटख्याशी साम्य असलेल्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एखादे उत्पादन खरोखरच चांगले असल्याचा दावा करून त्याची जाहिरात केली जात असेल, तर संबंधित सेलिब्रिटींनी आधी स्वतः ते वापरावे आणि आपल्या कुटुंबालाही वापरण्यास सांगावे, अशा शब्दांत मुंढे यांनी जाहिरातदार सेलिब्रिटींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.https://maharashtramirror.com/ Mumbai News :

एफडीएने यापूर्वी अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना पान-मसाल्याशी संबंधित जाहिरातींच्या प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना मुंढे यांनी अशा जाहिरातींबाबत आपली भूमिका मांडली.https://maharashtramirror.com/ Mumbai News

‘दुटप्पीपणा मला मान्य नाही’

मुंढे यांनी सेलिब्रिटींच्या जाहिरातीतील भूमिकेवर भाष्य करताना दुटप्पी वागणुकीवर टीका केली. आपण जे बोलतो, करतो आणि ज्या गोष्टीचा प्रचार करतो, त्याबाबत स्वतः प्रामाणिक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

“मला दुटप्पीपणा आणि दुतोंडी वागणे पटत नाही. तुम्ही जे काम करता, जे बोलता आणि जसे वागता, त्याबाबत स्वतःच प्रामाणिक नसाल, तर एका ठिकाणी एक आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळा चेहरा दाखवण्यासारखे ते आहे,” असे मुंढे म्हणाले.

‘आधी स्वतः खा, मग मुलांना द्या’

पान-मसाल्यासारख्या उत्पादनांच्या जाहिरातींबाबत मुंढे यांनी सेलिब्रिटींना थेट सवाल केला. “ज्या उत्पादनाची जाहिरात करता ते खरोखरच चांगले असेल, तर सुरुवात स्वतःपासून करा. लोकांना त्याचे अनुकरण करायला सांगण्याआधी स्वतः ते वापरा. पान-गुटख्याची जाहिरात करत असाल तर आधी स्वतः खाऊन पाहा, त्यानंतर आपल्या मुलांनाही द्या आणि त्यांनाही त्याची सवय लावा,” असे मुंढे म्हणाले.

जाहिरातींमध्ये उत्पादनात केशर असल्याचा उल्लेख केला जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. “त्यात केशर आहे असे सांगत असाल, तर तुम्हालाही ते खावेसे वाटले पाहिजे. आधी स्वतःच्या कुटुंबाला ते खायला सांगा आणि त्यानंतर देशातील इतर लोकांना सांगा,” असे त्यांनी म्हटले.

नियमभंगाच्या जाहिरातींवर कठोर भूमिका

नियमांचे उल्लंघन करून अशा उत्पादनांची जाहिरात करणे केवळ अनैतिक नसून बेकायदेशीर असल्याचेही मुंढे यांनी स्पष्ट केले. एफडीएने संबंधित सेलिब्रिटींना कारणे दाखवा नोटीस बजावून उत्तर देण्यासाठी मुदत दिली आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढील कारवाई केली जाऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.

दूध भेसळ, अस्वच्छ हॉटेल्स आणि भेसळयुक्त पनीरविरोधातील कारवायांनंतर आता पान-मसाल्याशी संबंधित जाहिरातींच्या मुद्द्यावर एफडीएने लक्ष केंद्रित केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share