Skip to content

Traffic News : ‘ट्रॅफिक बडी’चे वाहतुकीवर लक्ष; व्हॉट्सॲपवरून थेट तक्रार

पिंपरी, महाराष्ट्र मिरर Traffic News : वाहतूक कोंडी, नो-पार्किंगमधील वाहने, रस्त्यावर उभी केलेली अवजड वाहने, सिग्नल तोडणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन अशा समस्यांची तक्रार करण्यासाठी नागरिकांना आता पोलिस ठाणे किंवा वाहतूक विभागात जाण्याची गरज राहिलेली नाही.

VZ
Vidula Zagade

2 min read

Traffic News : ‘ट्रॅफिक बडी’चे वाहतुकीवर लक्ष; व्हॉट्सॲपवरून थेट तक्रार

जुलैमध्ये २,५७५ तक्रारी; नियमभंगाच्या ९४५, तर बेकायदा पार्किंगच्या ७८८ तक्रारी

पिंपरी, महाराष्ट्र मिरर Traffic News : वाहतूक कोंडी, नो-पार्किंगमधील वाहने, रस्त्यावर उभी केलेली अवजड वाहने, सिग्नल तोडणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन अशा समस्यांची तक्रार करण्यासाठी नागरिकांना आता पोलिस ठाणे किंवा वाहतूक विभागात जाण्याची गरज राहिलेली नाही. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांच्या ‘ट्रॅफिक बडी’ व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना फोटोसह थेट तक्रार नोंदविता येत आहे. जुलै महिन्यात या सुविधेद्वारे तब्बल २,५७५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.Traffic News

वाहतूक नियमांचे उल्लंघन नागरिकांना पुराव्यासह पोलिसांच्या निदर्शनास आणून देता यावे, यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी १८ जून २०२५ पासून ‘ट्रॅफिक बडी’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी ८७८८६४९८८५ हा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा क्रमांक मोबाइलमध्ये जतन करून संदेश पाठविल्यानंतर नागरिकांना प्रथम भाषा निवडता येते. त्यानंतर नाव नोंदवून तक्रारीचा प्रकार निवडण्याची सुविधा आहे.Traffic News

वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहतूक कोंडी, अनियमितता, खराब रस्ते, बेकायदा पार्किंग, वाहतूक सिग्नलमधील समस्या, जड-अवजड वाहनांकडून होणारे नियमभंग तसेच अन्य सूचना असे विविध पर्याय चॅटबॉटमध्ये उपलब्ध आहेत. संबंधित पर्याय निवडल्यानंतर मिळणाऱ्या लिंकद्वारे नागरिकांना घटनास्थळाचा फोटो अपलोड करता येतो. ही माहिती थेट वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात पोहोचते आणि तेथून संबंधित वाहतूक विभागाला कळवून पुढील कार्यवाही केली जाते.Traffic News

जुलैमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या सर्वाधिक ९४५ तक्रारी आहेत. त्याखालोखाल बेकायदा पार्किंगच्या ७८८, वाहतूक कोंडीच्या ३५५, खराब रस्त्यांच्या ७७, वाहतूक सिग्नलच्या ५६, जड-अवजड वाहनांच्या नियमभंगाच्या २३ आणि अनियमिततेच्या २२ तक्रारींचा समावेश आहे. अन्य स्वरूपाच्या ५८ सूचना प्राप्त झाल्या, तर २५१ तक्रारी फेटाळण्यात आल्या.Traffic News

या डिजिटल व्यवस्थेमुळे पोलिस किंवा वाहतूक नियंत्रण कॅमेऱ्यांच्या नजरेआड होणारे नियमभंगही नागरिकांच्या माध्यमातून थेट वाहतूक पोलिसांपर्यंत पोहोचू लागले आहेत. त्यामुळे नागरिक आणि वाहतूक पोलिसांमधील संवाद अधिक सुलभ होण्याबरोबरच संबंधित तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठीही ही यंत्रणा उपयुक्त ठरत आहे.Traffic News

जुलैमध्ये ‘ट्रॅफिक बडी’कडे तक्रारी

वाहतूक नियमांचे उल्लंघन — ९४५
बेकायदा पार्किंग — ७८८
वाहतूक कोंडी — ३५५
खराब रस्ते — ७७
इतर सूचना — ५८
वाहतूक सिग्नल — ५६
जड-अवजड वाहनांकडून नियमभंग — २३
अनियमितता — २२
फेटाळलेल्या तक्रारी — २५१
एकूण — २,५७५

Traffic News

Share