पिंपळे निलख येथील उड्डाणपूल काल सुरू अन् आज अपघात
पुलाची उंची आणि तीव्र उतार यावरून राजकीय वादंग झाले होते
1 min read

पुलाची उंची आणि तीव्र उतार यावरून राजकीय वादंग झाले होते
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पिंपळे निलख परिसरातील रक्षक चौक येथील नवनिर्मित उड्डाणपुल कालपासून वाहतुकीस अधिकृतपणे खुला केला. अन् आज सकाळी या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकांना धडकून उलटली. या पुलाची उंची आणि तीव्र उतार यावरून राजकीय वादंग उठले होते. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध स्थानिक भाजप नेते असा काहीसा प्रकार पाहायला मिळाला होता. उद्घाटनाचा कोणताही सोहळा न करता वाहतूक कोंडी लक्षात घेता कालपासून हा पूल वाहनांसाठी खुला करण्यात आला आणि आज सकाळी अपघात झाला आहे.
Photos · 1/1
Arrow Keys ⟵ ⟶
महत्त्वाच्या औंध-बीआरटीएस रस्त्यावर असलेला हा पायाभूत सुविधा प्रकल्प औंध ते किवळे दरम्यानचा मार्ग मुख्यत्वे सिग्नलमुक्त करण्यासाठी आणि मुंबई महामार्गाच्या दिशेने जाणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बनवला गेला आहे.


