Thane crime : ठाणे गुन्हे शाखेने देशभरातील नागरिकांना लुटणारी आंतरराज्य सायबर टोळी केली जेरबंद
Thane crime ठाणे: इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या नावांनी बनावट आयडी तयार करून स्वस्त दरात आयफोन, नामांकित कंपन्यांचे मोबाईल फोन आणि फर्निचर विक्रीच्या नावाखाली देशभरातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य सायबर भामट्यांच्या टोळीचा उल्हासनगर गुन्हे शाखेने (घटक-४) पर्दाफाश केला आ
2 min read

Thane crime : इन्स्टाग्रामवर स्वस्त आयफोन व फर्निचरचे आमिष दाखवले; ५ जणांना अटक
Thane crime ठाणे: इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या नावांनी बनावट आयडी तयार करून स्वस्त दरात आयफोन, नामांकित कंपन्यांचे मोबाईल फोन आणि फर्निचर विक्रीच्या नावाखाली देशभरातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य सायबर भामट्यांच्या टोळीचा उल्हासनगर गुन्हे शाखेने (घटक-४) पर्दाफाश केला आहे.या कारवाईत पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त केले आहेत.https://maharashtramirror.com/ Thane crime
इन्स्टाग्रामवर बनवले बनावट आयडी
मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी उल्हासनगर परिसरात राहून संपूर्ण भारतात सायबर गुन्हे करत होती. आरोपींनी इन्स्टाग्रामवर '360 Mobiles', 'farniture jayesh mobiles', 'dhaval mobiles', 'Devamobiles', 'Nikhilmobiles', 'Nileshmoblies', 'Vivekcommonication', 'modern_mobiles' यांसारखे अनेक बनावट आयडी तयार केले होते. या आयडीवरून महाराष्ट्रासह राजस्थान, आसाम, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, मेघालय आणि पश्चिम बंगाल यांसारख्या अनेक राज्यांतील नागरिकांना अतिशय कमी किमतीत आयफोन व फर्निचर देण्याच्या खोट्या जाहिरातींद्वारे आकर्षित केले जायचे.https://maharashtramirror.com/ Thane crime
पार्सल पाठवल्याचे भासवून बँक खात्यांवर ऑनलाईन पैसे मागायचे
ग्राहकांनी ऑर्डर दिल्यानंतर ही टोळी पार्सल पॅकिंगचे बनावट व्हिडिओ आणि खोटे बारकोड तयार करून व्हॉट्सॲपवर पाठवायची, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास बसत असे. पार्सल पाठवल्याचे भासवून आरोपी वेगवेगळ्या बँक खात्यांवर ऑनलाईन पैसे मागवून घ्यायचे. मात्र, पैसे मिळताच ग्राहकांना कोणतीही वस्तू न पाठवता त्यांच्याशी संपर्क तोडून टाकण्यात येत असे.https://maharashtramirror.com/ Thane crime
छापा टाकून ५ आरोपींना रंगेहात अटक
उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार, पोलिसांनी उल्हासनगरमधील संशयित ठिकाणी छापा टाकून ५ आरोपींना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे उल्हासनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८(४), ३१८(५), ३(५) व आयटी ॲक्ट ६६(क), ६६(ड) अंतर्गत दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे.
तब्बल ७५ तक्रारी देशभरात नोंदवल्या गेल्याचे निष्पन्न
राष्ट्रीय सायबर पोर्टलवरील प्राथमिक तपासणीत या टोळीने वापरलेले मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडींशी संबंधित तब्बल ७५ तक्रारी देशभरात नोंदवल्या गेल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी आरोपींनी ११४ वेगवेगळ्या बँक खात्यांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या सर्व ५ आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, अशा प्रकारे इन्स्टाग्रामवरील जाहिरातींना बळी पडलेल्या नागरिकांनी उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ कडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
ही धडक कारवाई ठाणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ. पंजाबराव उगले, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव व सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. पथकातील इतर अधिकाऱ्यांची नांवे पुढीलप्रमाणे: सपोनि श्रीरंग गोसावी, पोउनि अशोक पवार, सपोउनि बबन बांडे, कुणाल परदेशी, मंगेश जाधव, प्रकाश पाटील, रितेश वंजारी, सतीश सपकाळे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, अमर कदम, चंद्रकांत सावंत, सुरेश जाधव, शेखर भावेकर, मिलिंद हिंदुराव, गणेश गावडे, किशोर पाटील, विक्रम जाधव, बाबुलाल जाधव, प्रसाद तोंडलीकर, संजय शेरमाळे, रेवणनाथ शेकडे, रामदास उगले, मीनाक्षी खेडेकर, कुसुम शिंदे, आणि मनोरम सावळे.


