Skip to content

Thackeray Group : मीनाताईंच्या पुतळ्यावर पुन्हा हल्ला होऊ नये म्हणून ‘ठाकरे’ सेनेची खबरदारी; पुतळ्याभोवती काचेचे आवरण बसवणार

Thackeray Group Latest News : लाल ऑइल पेंटने पुतळा विद्रूप; शिवसैनिकांनी त्वरेने रंग काढून टाकला, मध्यरात्री एका आरोपीला अटक

V
Vivek

1 min read

मुंबई :- शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे Minatai Thackeray यांच्या पुतळ्यावर बुधवारी काही समाजकंटकांनी लाल रंग फेकल्याच्या घटनेनंतर, अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे पुतळ्याचे संरक्षण करण्यासाठी तो पारदर्शक काचेने बंदिस्त करण्यात येणार आहे.

बुधवारी सकाळी ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवाजी पार्क परिसरात जमा झाले होते, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. समाजकंटकांनी पुतळ्यावर मोठ्या प्रमाणात लाल ऑइल पेंट फेकला होता.

शिवसैनिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पुतळा स्वच्छ करण्याचे काम सुरू केले. शाखाप्रमुख अजित कदम आणि माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी तब्बल चार लिटर ‘थिनर’चा वापर करून पुतळ्यावरील रंग घासूनपुसून काढून टाकला. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बुधवारी मध्यरात्री एका आरोपीला अटकही केली आहे.

Share