मुंबईत भीषण अपघात: बेस्ट बसने चिरडल्याने पादचारी महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Mumbai BEST Accident News : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर काळाचा घाला, सह्याद्री अतिथीगृहाजवळ घडली घटना
1 min read

Mumbai BEST Accident News : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर काळाचा घाला, सह्याद्री अतिथीगृहाजवळ घडली घटना
मुंबई :- सह्याद्री अतिथीगृहाजवळ एका भीषण अपघाताने संपूर्ण मुंबई हादरली आहे. आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका महिलेला बेस्टच्या भरधाव इलेक्ट्रिक बसने चिरडले. या दुर्दैवी घटनेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारला धडकली, ज्यात ती महिला बस आणि कारच्या मध्ये सापडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टची इलेक्ट्रिक बस सह्याद्री अतिथीगृहासमोरून जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. बसने थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारला जोरदार धडक दिली. याच कारजवळ एक पादचारी महिला उभी होती, जी या दोन्ही वाहनांच्या मध्ये सापडली. धडक इतकी जोरदार होती की, महिलेचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचे भयानक दृश्य पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले आणि पोलिसांना माहिती दिली. महिलेला तातडीने जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर महिला दक्षिण मुंबईतील रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे मुंबईतील रस्त्यांवर वाढलेल्या अपघातांवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.


