Skip to content

शहरात बदनामीकारक बॅनर्स लावणाऱ्यांवर कारवाई करा

पुणे शहर काँग्रेसची पोलीस प्रशासनाकडे मागणी

PG
Prashik Ghaste

1 min read

शहरात बदनामीकारक बॅनर्स लावणाऱ्यांवर कारवाई करा

पुणे शहर काँग्रेसची पोलीस प्रशासनाकडे मागणी

निलेश राऊत
पुणे: महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे पुणे शहर जिल्हा प्रभारी सतेज (बंटी) पाटील यांच्याबाबत मागील २-३ दिवसांत बदनामीकारक मजकूर छापून काही समाजकंटकांनी विविध चौकांमध्ये बॅनर्स लावले आहेत. हा खोडसाळपणा माजी राज्यमंत्र्यांना, भारताच्या स्वातंत्र्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या काँग्रेस पक्षाला बदनाम करणारा आहे. तसेच, पुणे शहरातील शांतता व सुव्यवस्था भंग करण्याचाही हा प्रयत्न आहे. अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याबाबत पुणे शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पुणे शहराचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील साहेब यांची भेट घेऊन लेखी मागणी केली.

हे सर्व अनधिकृत बॅनर्स ज्या ठिकाणी लावले आहेत ती सर्व ठिकाणे पुणे शहर पोलिसांच्या सीसीटीव्ही कक्षेत येतात. तरी, पोलीस प्रशासनाने हे सीसीटीव्ही फुटेज तपासून, अनधिकृत बॅनर्स लावणाऱ्या गुन्हेगारांचा छडा लावावा. तसेच, या गुन्हेगारांवर माजी राज्यमंत्र्यांच्या बदनामीचा, राष्ट्रीय पक्षाच्या नावाचा गैरवापर करण्याचा, शहर विद्रूपीकरणाचा, तसेच पुणे शहरात दंगल सदृश्य वातावरण तयार करण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी अशी मागणी पुणे शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली.

यावेळी पुणे (पूर्व) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे (पश्चिम) शहराध्यक्ष दीप्ती चवधरी, जेष्ठ नेते, माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, ज्येष्ठ नेते गोपाळ तिवारी, गटनेते चंदूशेठ कदम, नगरसेवक सुनील शिंदे, प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे उपस्थित होते.

Share