Skip to content

Pune News : स्वारगेट डेपोत २३० जणांचे रक्तदान

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) आणि भारतीय संविधान राष्ट्रविकास अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वारगेट डेपो येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

स्वारगेट डेपोत २३० जणांचे रक्तदान स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक बांधिलकीचा जागर
स्वारगेट डेपोत २३० जणांचे रक्तदान स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक बांधिलकीचा जागर

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) आणि भारतीय संविधान राष्ट्रविकास अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वारगेट डेपो येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल दोनशे तीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. https://maharashtramirror.com/ Pune News
‘आपण समाजाचे, भारत देशाचे आणि महाराष्ट्राचे काहीतरी देणे लागतो,’ ही भावना मनात ठेवून पीएमपीएमएलच्या चालक, वाहक, वर्कशॉप विभाग तसेच प्रशासकीय विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune News
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वारगेट डेपोमध्ये श्रावण महिन्यातील सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले. तसेच पुणेकरांची ‘अन्नदाता आणि जीवनवाहिनी’ असलेल्या पीएमपीएमएलच्या सार्वजनिक बसची विधिवत पूजा करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख राहावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune News
या कार्यक्रमास विद्याभूषण डॉ. प्रशांत पगारे, उद्योजक अभय थोरात, रक्तमहर्षी राम बांगड, पं. नेहरू स्टेडियम ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हेमंत राजभोज, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे माजी खजिनदार सुमित डांगी, नितीन येल्लारपूरकर, पै. गोरख पळसकर, गजानन सोनवणे तसेच पीएमसी अर्बन बँकेचे संचालक शेखर सावंत, संचालक प्रवीण नेटके आदी उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ Pune News
शिबीराचे आयोजन पीएमपीएमएलचे डेप्युटी चीफ मॅनेजर शैलेंद्र जगताप, असिस्टंट डेपो मॅनेजर अंकुश कदम, डीएमईविकास जाधव, प्रभारी डीएमई तुषार यादव यांच्यासह पुणे म्युनिसिपल अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष सुनील कांबळे, रूत मणिकम, सागर कांबळे, विजय मोरे, बाबू मुलाणी, सुनील दर्गे, फरीद पठाण, प्रदीप कदम, गणेश गायकवाड, संदीप सातपुते, सुमित परदेशी, सचिन जगताप, राजू राठोड, रोहित थोरात, अक्षय चव्हाण, मारुती भालेकर, मारुती सांगळे, रफिक पटेल, संदेश कुंभार, संतोष फराटे, रमेश बिरकुटे, उमेश इप्पे, राजेंद्र पाटील, प्रशांत चाबुकस्वार, सतीश येवले, तानाजी कांबळे, कुणाल भोसले, किशोर परदेशी, विजय दाभोळकर, मोराळे, फिरोज शेख, असद सय्यद, महेश पवार, किरण रासकर, लक्ष्मण कुंभार, मंगेश गोडसे, वर्षा देशमुख, संदीप रासकर आणि संतोष नलावडे यांचे मोलाचे योगदान लाभले.

Share