रावेत गोळीबार प्रकरणात संशयितांना दिली होती सुपारी
सिद्धू मुसावाला हत्या प्रकरणातील आरोपीने जेलमधून केला कट
1 min read

सिद्धू मुसावाला हत्या प्रकरणातील आरोपीने जेलमधून केला कट
रावेतमध्ये फर्निचर मॉलच्या मालकावर झालेल्या गोळीबार प्रकरणात खळबळजनक माहिती उघड झाली आहे. प्रसिद्ध गायक सिद्धू मुसावाला हत्या प्रकरणातील आरोपी कुलदीप उर्फ कशीश याने जेल मधून संपर्क करत रावेत येथील गोळीबार प्रकरणातील आरोपींना सुपारी दिली. चंदिगढ येथे तिघांना पिस्तूल आणि 23 काडतुसे देण्यात आली. सोनीपत येथे त्यांचा गोळीबार करण्याचा सराव झाला. 14 मे रोजी तीनही आरोपी पिंपरी चिंचवडमध्ये आले आणि 15 मे रोजी त्यांनी रात्री गोळीबार केला आणि पळून गेले.
Photos · 1/1
Arrow Keys ⟵ ⟶
पंकज कुलदीप (२१), परवीन रामनिवास (२२), सागर अजयपाल (२१, सर्व रा. हरियाणा) यांना गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने हरिद्वार येथून ताब्यात घेतले. त्यांना बुधवारी रात्री उशिरा पिंपरी-चिंचवड येथे आणण्यात आले आणि न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
क्राईम न्युज


