Suryakanta Patil : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी मंत्री सूर्यकांता पाटील आज शरद पवार गटात जाणार, काल राजीनामा दिला होता.
Suryakanta Patil Resigns From BJP : केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे.
1 min read

Suryakanta Patil Resigns From BJP : केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. आज दुपारी 3 वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत
नांदेड : भाजपला मोठा धक्का बसला असून माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील Suryakanta Patil यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांचा Sharad Pawar हात धरला आहे. आज पाटील राष्ट्रवादी कार्यालयात पक्षप्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपचा राजीनामा दिला आहे.
गेल्या 10 वर्षात मी खूप काही शिकलो, मी पक्षाची ऋणी आहे, असे सांगत सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिला आहे. हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी सूर्यकांता पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते, त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी राजीनामा दिला आहे.
सूर्यकांता पाटील यांनी हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे चार वेळा खासदार आणि एकदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. त्या ग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री होत्या. यानंतर त्यांनी संसदीय कामकाज मंत्रालयात राज्यमंत्रीपदही भूषवले.सूर्यकांता पाटील 1980 मध्ये हदगाव मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. सूर्यकांता पाटील 1986 मध्ये काँग्रेसमधून राज्यसभेवर गेल्या, 1991, 1998 आणि 2004 मध्ये त्या तीनदा लोकसभेवर निवडून गेल्या.
कोण आहेत सूर्यकांता पाटील?
Suryakanta Patil : Big blow to BJP before assembly elections, former minister Suryakanta Patil will join Sharad Pawar group today, he had resigned yesterday.


