Skip to content

सुप्रिया सुळेंची कायदा-सुव्यवस्थेवरून राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर जोरदार टीका

कोयता गँग, महिलांची सुरक्षा, अवैध दारू आणि पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर केले प्रश्न उपस्थित

PG
Prashik Ghaste

1 min read

सुप्रिया सुळेंची कायदा-सुव्यवस्थेवरून राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर जोरदार टीका

कोयता गँग, महिलांची सुरक्षा, अवैध दारू आणि पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर केले प्रश्न उपस्थित

प्रतीक्षा पारखी

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील विषारी दारूकांड, वाढती गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेवरून राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते, मात्र आता वाढत्या गुन्हेगारीमुळे “क्राइम कॅपिटल” बनत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सुळे यांनी गृह विभागावर अपयशाचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची मागणी केली. कोयता गँग, महिलांची सुरक्षा, अवैध दारू आणि पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच नसरापूर घटनेनंतर दिलेल्या आश्वासनांप्रमाणे जलद न्याय मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

Share