Skip to content

Sunil Tatkare : अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत खळबळ! सुनील तटकरेंवर नाराज असलेल्या 'त्या' 3 नेत्यांचे राजीनामे मंजूर; पक्षात मोठी फूट पडणार?

•अजित पवारांनी जे राजीनामे रोखून धरले होते, ते महिन्याभरानंतर स्वीकारले | कोणत्याही चौकशीविना नेत्यांना घरचा रस्ता | प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंविरोधातील नाराजी आता उघड

V
Vivek

1 min read

Sunil Tatkare : अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत खळबळ! सुनील तटकरेंवर नाराज असलेल्या 'त्या' 3 नेत्यांचे राजीनामे मंजूर; पक्षात मोठी फूट पडणार?

•अजित पवारांनी जे राजीनामे रोखून धरले होते, ते महिन्याभरानंतर स्वीकारले | कोणत्याही चौकशीविना नेत्यांना घरचा रस्ता | प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंविरोधातील नाराजी आता उघड

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला महिना उलटत नाही, तोच पक्षात मोठी पडझड सुरू झाली आहे. अजितदादा हयात असताना ज्या तीन प्रमुख नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते, ते राजीनामे आता अचानक मंजूर करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या नेत्यांना राजीनाम्याचे कारणही न विचारता थेट कार्यमुक्त करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे.

नेमके प्रकरण काय?

28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र, त्यापूर्वी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी पक्षाच्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी अजितदादांची भेट घेऊन आपले राजीनामे सुपूर्द केले होते. त्यावेळी दादांनी हे राजीनामे मंजूर करण्यास नकार दिला होता आणि नेत्यांची समजूत काढली होती. मात्र, आता दादांच्या अनुपस्थितीत हेच राजीनामे स्वीकारले गेल्याने "अजितदादा असतानाची वागणूक आणि आताची वागणूक यात जमीन-अस्मानाचा फरक आहे," अशी भावना पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

राजीनामा देणारे 'ते' तीन शिलेदार कोण?

1.मनोज व्यवहारे – प्रदेशाध्यक्ष, असंघटित कामगार विभाग

2.सुभाष मालपाणी – प्रदेशाध्यक्ष, उद्योग विभाग

3.सचिन जाधव – प्रदेशाध्यक्ष, मोटार मालक वाहतूक संघटना

सुनील तटकरेंवर निशाणा?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा देणाऱ्या या तिन्ही नेत्यांची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी होती. त्यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळेच या नेत्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता अजितदादांच्या निधनानंतर तटकरे यांनी या नेत्यांचे राजीनामे कोणत्याही संवादाशिवाय मंजूर केल्याने पक्षात 'हुकूमशाही' सुरू झाल्याची कुजबूज सुरू झाली आहे.

Share