Pune News : हरवलेली पिशवी परत मिळवून देणाऱ्या सुनील दिवाणजींचे कौतुक!प्रवाशांच्या मदतीसाठी तत्परता; कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणातून सार्वजनिक वाहतूक सेवेचा विश्वास दृढ
Pune News :पुणे : प्रवाशांची अडचण समजून घेत तातडीने मदतीसाठी धावून जाण्याची तत्परता पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) आगारप्रमुख सुनील दिवाणजी यांनी दाखवून दिली.
1 min read

Pune News :पुणे : प्रवाशांची अडचण समजून घेत तातडीने मदतीसाठी धावून जाण्याची तत्परता पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) आगारप्रमुख सुनील दिवाणजी यांनी दाखवून दिली. बसमध्ये विसरलेली प्रवाशाची पिशवी शोधून सुखरूप परत मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या सहकार्याचे कौतुक होत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
अभिनंदन कासार हे शिवाजीनगरहून सुसगाव येथे पीएमपीएमएल बसने प्रवास करत होते. मार्केट यार्ड ते घोटावडे या मार्गावरील बसमधून सुसगाव येथे उतरताना त्यांच्याकडे एक सॅक आणि एक पिशवी होती. मात्र, बसमधून उतरल्यानंतर एक पिशवी बसमध्येच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने आगारप्रमुख सुनील दिवाणजी यांच्याशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली.
प्रवाशाच्या अडचणीची दखल घेत दिवाणजी यांनी बसच्या तिकिटाचा फोटो मागवला आणि संबंधित वाहकाशी संपर्क साधला. त्यानंतर पिशवी शोधण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली. त्यांच्या तत्पर सहकार्यामुळे अभिनंदन कासार यांना आपली हरवलेली पिशवी सुखरूप परत मिळाली.
या मदतीबद्दल कासार यांनी दिवाणजी यांचे आभार मानले. प्रवाशांच्या समस्यांना त्वरित प्रतिसाद देणे, जबाबदारीने काम करणे आणि सहकार्याची भावना जपणे, ही सार्वजनिक वाहतूक सेवेतील महत्त्वाची मूल्ये आहेत. दिवाणजी यांनी दाखवलेली तत्परता इतर कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे. प्रवाशांच्या सोयीसोबतच त्यांच्या विश्वासाला महत्त्व देणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांमुळे पीएमपीएमएल सेवेबद्दल सकारात्मक भावना निर्माण होते. या कर्तव्यदक्षतेबद्दल सुनील दिवाणजी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


