Nanded News : मी मराठवाड्याची लेक आणि स्वतः शेतकरी; सुनेत्रा पवार यांची शेतकऱ्यांना ग्वाही
Nanded News : नांदेड : शेतकऱ्यांचे प्रश्न आणि व्यथा शांतपणे ऐकून घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी त्यांना आपुलकीने धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
1 min read

Nanded News : नांदेड : शेतकऱ्यांचे प्रश्न आणि व्यथा शांतपणे ऐकून घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी त्यांना आपुलकीने धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. “मी मराठवाड्याची लेक आहे आणि स्वतः एक शेतकरी आहे. त्यामुळे तुमच्या वेदना, अडचणी आणि भावना मी जवळून समजू शकते,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला. https://maharashtramirror.com/ Nanded News
नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी संबंधित अधिकारी शेतांचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला सादर करतील. मात्र, केवळ कागदी नियम आणि आश्वासनांपुरते शासनाचे काम मर्यादित राहणार नाही, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. “शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी शासन म्हणून आम्ही वेगाने पावले उचलू. तसेच, तुमच्या मुलांच्या शिक्षणाची चिंता तुम्ही करू नका; त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक मदत सरकार करेल,” असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ ऐकून न घेता त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगत, संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.https://maharashtramirror.com/ Nanded News


