Mumbai news : अजित पवारांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा सुनेत्रा पवार यांचा निर्धार
Mumbai news : मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला आज आठ महिने पूर्ण झाले.
1 min read

Mumbai news : मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला आज आठ महिने पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्या. त्यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला नतमस्तक होत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी, “दादा, तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुनेत्रा पवार आज विद्या प्रतिष्ठान येथे पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होत मनात साठलेल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या भावनिक पोस्टमधून त्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला.https://maharashtramirror.com/ Mumbai news
“आठ महिने झाले… तरी प्रत्येक कार्यकर्त्याच्या, प्रत्येक सामान्य माणसाच्या मुखी आजही एकच जिव्हाळ्याचा शब्द आहे—‘दादा’. त्या एका शब्दात तुमच्यावरील त्यांचं प्रेम, विश्वास आणि नातं सामावलेलं आहे. आज त्यांच्याच भावना मनात घेऊन तुमच्यासमोर उभी आहे,” असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं.अजित पवारांच्या पश्चात जबाबदारी स्वीकारताना त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धारही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.https://maharashtramirror.com Mumbai news
“तुमची सहचारिणी म्हणून तुमच्यानंतर ही जबाबदारी स्वीकारताना माझ्या मनात एकच ध्यास आहे—तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण करणं आणि तुम्ही जपलेला माणुसकीचा वारसा पुढे नेणं. तुम्ही दिलेली शिकवण आणि जनतेशी जोडलेलं हे नातं मी आयुष्यभर मनापासून जपत राहीन,” असा शब्द त्यांनी अजित पवारांना दिला.
अजित पवारांच्या स्मृतींना अभिवादन करताना सुनेत्रा पवार यांच्या भावनिक शब्दांतून त्यांच्या आठवणी आणि जनतेशी असलेलं नातं अधोरेखित झालं.


