Skip to content

Sunday Railway Mega Block : रेल्वे प्रवाशांचे हाल; मध्य आणि पश्चिम रेल्वेवर या आठवड्यात मेगाब्लॉक

•मध्य रेल्वेवर रविवारी तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री दुरुस्तीचे काम; अनेक लोकल फेऱ्या रद्द आणि वळवण्यात आल्या

V
Vivek

1 min read

Mega block of railways on Sunday, (July 7): Impact of mega block on Central and Harbor lines

•मध्य रेल्वेवर रविवारी तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री दुरुस्तीचे काम; अनेक लोकल फेऱ्या रद्द आणि वळवण्यात आल्या

मुंबई :- मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबून पुढे पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच, घाटकोपरवरून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार असून त्या ठराविक मुख्य स्थानकांवरच थांबतील.

दुसरीकडे, ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक राहील. या ब्लॉकमुळे ठाण्याहून वाशी, नेरूळ व पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि परतीच्या प्रवासातील सर्व ट्रान्स-हार्बर लोकल फेऱ्या पूर्णपणे रद्द राहणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री मेगाब्लॉक; रविवारी दिवसा प्रवाशांना दिलासा

पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवार आणि रविवारी मध्यरात्री 11.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत 5 तासांचा रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व अप आणि डाऊन जलद लोकल विरार व वसई रोड ते बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. ब्लॉकदरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

विशेष दिलासादायक बाब म्हणजे, शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येत असल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही, ज्यामुळे रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन रेल्वेच्या या वेळापत्रकानुसार करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: रवींद्र धंगेकर आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यातील वाद टोकाला; सोशल मीडियावरील पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Share