Skip to content

सायबर पोलिसांची यशस्वी कारवाई: 23 लाखांची फसवणूक केलेली रक्कम परत मिळवून दिली

Mumbai Mira Road Latest Cyber Crime News : ऑनलाइन ट्रेडिंग ॲपच्या जाळ्यात अडकले; पोलिसांच्या 10 महिन्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मिळाली रक्कम परत

V
Vivek

1 min read

सायबर पोलिसांची यशस्वी कारवाई: 23 लाखांची फसवणूक केलेली रक्कम परत मिळवून दिली

Mumbai Mira Road Latest Cyber Crime News : ऑनलाइन ट्रेडिंग ॲपच्या जाळ्यात अडकले; पोलिसांच्या 10 महिन्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मिळाली रक्कम परत

मिरा रोड :- बनावट ऑनलाइन शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करून आर्थिक फसवणूक झालेल्या एका व्यक्तीला मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने मोठा दिलासा दिला आहे. पोलिसांनी तब्बल 22 लाख 96 हजार 474 रुपयांची फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून तक्रारदाराच्या खात्यात जमा केली आहे.

अशी झाली फसवणूक

मिरा रोड येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर ऑनलाइन शेअर ट्रेडिंग ॲपची जाहिरात पाहिली. त्यात अधिक परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्या जाहिरातीतील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर, त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवली. काही दिवसांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना ते काढता आले नाहीत, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यानंतर त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई सुरू केली.

10 महिन्यांचा अथक पाठपुरावा

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून फसवणुकीची रक्कम देशभरातील 18 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे शोधून काढले. त्यानंतर, सर्व संशयित खाती तात्काळ गोठवण्यात आली. ही रक्कम परत मिळवण्यासाठी पोलिसांनी सलग 10 महिने या बँक खात्यांसोबत सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला. अखेरीस, न्यायालयात अर्ज सादर करून पोलिसांना आदेश मिळाल्यानंतर, फसवणूक झालेली सर्व रक्कम तक्रारदाराच्या मूळ बँक खात्यात परत मिळवण्यात यश आले.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सुजितकुमार मुंजकर आणि त्यांच्या टीमने पार पाडली आहे.

Share