Skip to content

पिंपरी-चिंचवड पोलिसांना नवे बळ!

८ चारचाकी (स्कॉर्पिओ एन) आणि ४२ दुचाकींसहित (होंडा ऍक्टिवा) ५० नव्या वाहनांचा ताफा दलात दाखल

PG
Prashik Ghaste

1 min read

पिंपरी-चिंचवड पोलिसांना नवे बळ!

८ चारचाकी (स्कॉर्पिओ एन) आणि ४२ दुचाकींसहित (होंडा ऍक्टिवा) ५० नव्या वाहनांचा ताफा दलात दाखल

पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि सुसज्जता वाढवण्यासाठी चौबे यांनी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणले आहेत

Photos · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

पिंपरी, एप्रिल १०, महाराष्ट्र मिरर: शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नव्याने ५० वाहनांचा ताफा समाविष्ट करण्यात आला आहे. यामध्ये ८ चारचाकी (स्कॉर्पिओ एन) आणि ४२ दुचाकी (होंडा अॅक्टिवा) वाहनांचा समावेश आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या पुढाकारातून ८ एप्रिल २०२६ रोजी ही वाहने जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करून प्राप्त करण्यात आली आहेत. पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि सुसज्जता वाढवण्यासाठी चौबे यांनी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणले आहेत.
वाहनसंख्येत लक्षणीय वाढ आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताना पोलीस दलाकडे एकूण ३१९ वाहने होती. वाढत्या शहर आणि कामकाजाच्या पार्श्वभूमीवर ही संख्या अपुरी ठरत होती. मात्र, सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता एकूण ३६७ नवीन वाहने पोलीस दलात समाविष्ट करण्यात आली आहेत.
जिल्हा नियोजन समितीकडून: १०२ मोटारसायकली, १५७ जीप, ३ लाईट व्हॅन, १ ट्रक,
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून: ७१ मोटारसायकली, २ कार, १ जीप, १६ लाईट व्हॅन, १३ बस, १ टॅन्कर, यामध्ये २५ मोटारसायकली बजाज कंपनीने प्रायोजित केल्या आहेत.
नागरिकांना होणार थेट फायदा वाहनांची संख्या वाढल्यामुळे पोलीसांची प्रतिसाद वेळ (response time) कमी होणार असून, नागरिकांना जलद व परिणामकारक सेवा मिळणार आहे. गस्त, गुन्हे प्रतिबंध आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलीस अधिक तत्परतेने कार्य करू शकतील.

New strength for Pimpri-Chinchwad Police!

Share