विधान परिषद निकालानंतर राजकारणात खळबळ; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट
•सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना वगळून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली अमित शाह यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
1 min read

•सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना वगळून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली अमित शाह यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
नवी दिल्ली :- राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यामुळे पक्षात अस्वस्थतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. पक्षाच्या खराब कामगिरीनंतर नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच, राष्ट्रवादीच्या काही प्रमुख आणि दिग्गज नेत्यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत.
सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय
विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेली ही भेट अत्यंत गुप्त आणि महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी पक्षाच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार उपस्थित नव्हते. या प्रमुख नेत्यांना वगळून झालेल्या या चर्चेमुळे राष्ट्रवादी पक्षांतर्गत आणि महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. निवडणुकीतील पराभवान्यानंतर पक्षात आत्मचिंतनाची मागणी होत असताना नेत्यांची ही दिल्ली वारी अनेकाच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.
आगामी राजकीय समिकरणांवर तीव्र चर्चा
गेल्या काही दिवसांत झालेल्या राजकीय घडामोडी आणि विधान परिषद निवडणुकीतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी काळात राज्याच्या राजकारणात किंवा महायुतीच्या अंतर्गत समीकरणात काही मोठे फेरबदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


