Skip to content

Sting Drink Ban: शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग' ड्रिंकच्या विक्रीवर बंदी

Sting Drink Ban

DO
Dhanshree Otari

3 min read

Sting Drink Ban
Sting Drink Ban

Sting Drink Ban : ६ मोठ्या ब्रँड्सना FSSAI ची नोटीस

मुंबई, महाराष्ट्र मिरर

Sting Drink Ban: राज्यातील शाळकरी मुलांचे आरोग्य आणि वाढत्या कॅफेनच्या विळख्यातून त्यांना वाचवण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व शाळांच्या ५०० मीटर परिसरामध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या 'स्टिंग' (Sting Drink Ban) या पेयाच्या विक्रीवर तातडीने बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभेत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या जनहितार्थ प्रश्नावर दखल घेत शासनाने हा निर्णय जाहीर केला. (sting drink ban school zone maharashtra)

Sting Drink Ban

Shivsena : पुण्यात ठाकरे गटाला वाचवण्यासाठी वसंत मोरे ‘सरसावले’!

दुसरीकडे, केंद्र सरकारच्या पातळीवरही या तथाकथित 'एनर्जी ड्रिंक्सवर' (Energy Drinks) मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) देशातील ६ आघाडीच्या एनर्जी ड्रिंक ब्रँड्सना चुकीची लेबलिंग आणि ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या दुहेरी कारवाईमुळे मऊ पेये आणि एनर्जी ड्रिंक्स तयार करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. (Sting Drink Ban)

मंत्री नरहरी झिरवळ यांचे थेट निर्देश

विधानसभेच्या चालू अधिवेशनात आमदार विक्रम पाचपुते यांनी शाळकरी मुले आणि तरुणांमध्ये वाढणाऱ्या 'स्टिंग' आणि इतर तत्सम पेयांच्या व्यसनाधीनतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. पाचपुते यांनी या संदर्भात सरकारला तीन मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. १८ वर्षांखालील मुलांना हे पेय विक्रीस परवानगी देऊ नये यासाठी नियमावली तयार केली जाणार का, एफडीए आयुक्तांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले जाणार का, तसेच दारूपेक्षाही हे पेय अधिक घातक असल्याच्या दाव्याबाबत सरकारची भूमिका काय,असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.

दरम्यान, शाळांमध्ये या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना या पेयाच्या दुष्परिणामांविषयी माहिती देण्यात येत असून, ते खरेदी करण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली. (sting drink ban school zone maharashtra)

Landslide : वरंधा घाटात दरड कोसळली; पंढरपूर-महाड मार्गावरील वाहतूक ठप्प

"लहान मुलांचे आरोग्य ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी," असे सांगत त्यांनी राज्यातील सर्व शाळांच्या ५०० मीटर परिघात स्टिंग पेयाची विक्री करण्यास संपूर्ण बंदी घालण्याचे आदेश प्रशासनाला दिले. काही दिवसांपूर्वी गुटखा, पानमसाला, सिगारेट या वस्तू शाळा परिसरात विक्रीस बंदी आहे. त्यात आता स्टिंग या शीतपेयाचा, सॉफ्ट ड्रिंकचाही समावेश झाला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. (Sting Drink Ban)

FSSAI ची मोठी कारवाई: ६ प्रसिद्ध ब्रँड्स रडारवर

महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयानंतर लगेचच अन्न सुरक्षा क्षेत्रात देशात सर्वोच्च असलेल्या 'FSSAI' ने एक मोठा झटका दिला आहे. बुधवारी FSSAI ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून (इन्स्टाग्राम पोस्ट) माहिती दिली की, देशात 'एनर्जी ड्रिंक' म्हणून विकल्या जाणाऱ्या ६ प्रमुख ब्रँड्सना लेबलिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. (Sting Drink Ban)

हेही वाचा: RTI: माहिती अधिकार कायद्यातील जाचक बदलांना अखेर स्थगिती

नोटीस मिळालेल्या ब्रँड्सची यादी

रेड बुल
स्टिंग एनर्जी ड्रिंक
ॲड्रेनालाइन रश
कॅम्पा एनर्जी ड्रिंक गोल्ड बूस्ट
मॉन्स्टर एनर्जी
हेल एनर्जी

FSSAI ने कंपन्यांवर ठेवलेला सर्वात गंभीर आरोप म्हणजे दिशाभूल करणारी जाहिरातबाजी हा आहे. प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, भारतीय अन्न सुरक्षा नियमावलीनुसार 'एनर्जी ड्रिंक्स' किंवा तत्सम पेयांच्या श्रेणीसाठी अद्याप कोणतेही विशिष्ट आणि अधिकृत मानक (Standard) निश्चित केलेले नाही.

RTI : CM Fadnavis stays Maharashtra RTI rules

"अशी कोणतीही कायदेशीर किंवा अधिकृत वर्गवारी अस्तित्वात नसतानाही, या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या ब्रँडिंग, लेबलिंग आणि जाहिरातींमध्ये 'एनर्जी ड्रिंक' या शब्दाचा सर्रास आणि बेकायदेशीर वापर केला आहे. हा ग्राहकांचा विश्वासघात असून यामुळे आरोग्याविषयी चुकीचे दावे जनमानसात पसरवले जात आहेत," असे FSSAI ने आपल्या नोटिशीत म्हटले आहे.

कंपन्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी अशा प्रकारची लेबलिंग करून उत्पादने बाजारात आणली, ज्यामुळे ग्राहकांना, विशेषतः तरुणांना असे वाटते की हे पेय प्यायल्याने शरीराला तातडीने आणि सुरक्षित ऊर्जा मिळते. मात्र, प्रत्यक्षात हा केवळ कॅफेन आणि साखरेचा अतिरेक असतो. (Sting Drink Ban)

शासनाने ५०० मीटर परिघाची मर्यादा घातली असली, तरी शाळांच्या आसपास असणाऱ्या टपऱ्या, किराणा दुकाने आणि सुपरमार्केट्सवर लक्ष ठेवणे हे अन्न व औषध प्रशासनासाठी (FDA) मोठे आव्हान ठरणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई आणि परवाना रद्द करण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आता पालकांकडून होत आहे.

नोटिस बजावलेल्या ६ कंपन्यांना आता FSSAI कडे आपले स्पष्टीकरण सादर करावे लागणार आहे. कंपन्यांचे उत्तर असमाधानकारक आढळल्यास, त्यांना बाजारातून आपला साठा मागे घ्यावा लागू शकतो किंवा त्यांच्या लेबलिंगमध्ये मोठे बदल करावे लागतील. महाराष्ट्रात मात्र, शाळांच्या परिसरातील बंदीमुळे या पेयांच्या अनिबंध विक्रीला मोठा लगाम बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

https://www.instagram.com/reel/DJpJcCnTgL0/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

Share