Skip to content

Pune News : एस.पी. कॉलेज परिसरातील ७ बेकायदेशीर फलकांवर कारवाई कधी?

Pune News : महत्वाचे मुद्दे *एस.पी.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

एस.पी. कॉलेज परिसरातील ७ बेकायदेशीर फलकांवर कारवाई कधी?
एस.पी. कॉलेज परिसरातील ७ बेकायदेशीर फलकांवर कारवाई कधी?

Pune News : पुराव्यासह पुणे मनपाच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या उपायुक्तांची भेट घेऊन प्रत्यक्ष तक्रार करून तिचा पाठपुरावा केला परंतु अद्याप कोणतीही कारवाई नाही; तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर पुणे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

Pune News : महत्वाचे मुद्दे
*एस.पी. कॉलेजच्या आवारात उभे असलेले हे ७ होर्डिंग्ज अनधिकृत आहेत
*याप्रकरणी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी २१ मे २०२६ रोजी पहिली तक्रार दाखल केली
*या तक्रारीनुसार, ५ होर्डिंग्जच्या मालक कंपन्यांनी आणि शिक्षण प्रसारक मंडळीने नोटराइज्ड करार करून शासनाची फसवणूक केली
*सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (पुणे शहर) यांनी शिक्षण प्रसारक मंडळीला दोन वेळा कायदेशीर नोटीसा बजावल्या
*संबंधित होर्डिंग व्यावसायिक आणि संस्थेमध्ये कोणताही वैध भाडेकरार झालेला नाहीhttps://maharashtramirror.com/ Pune News

Pune News : पुणे, धनश्री ओतारी

Pune News :पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग्जचा विषय महानगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरत असतानाच, प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एका बाजूला बेकायदेशीर फलकांवर कारवाईचे दावे केले जात असताना, दुसरीकडे काही ठराविक ठिकाणी मात्र प्रशासकीय यंत्रणा मौन बाळगून असल्याचे पाहायला मिळत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

टिळक रोडवरील प्रतिष्ठित शिक्षण प्रसारक मंडळीच्या (शिप्र मंडळी) एस.पी. कॉलेजच्या आवारातील तब्बल ७ अनधिकृत होर्डिंग्जचा असाच एक प्रकार समोर आला असून, वारंवार तक्रारी देऊनही त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

शासनाची फसवणूक


मिळालेल्या माहितीनुसार, एस.पी. कॉलेजच्या आवारात उभे असलेले हे ७ होर्डिंग्ज पूर्णपणे अनधिकृत आहेत. याप्रकरणी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी २१ मे २०२६ रोजी पहिली तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, ५ होर्डिंग्जच्या मालक कंपन्यांनी आणि शिक्षण प्रसारक मंडळीने नोटराइज्ड करार करून शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या गंभीर प्रकारची दखल घेत सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (पुणे शहर) यांनी शिक्षण प्रसारक मंडळीला १ जुलै आणि त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी अशा दोन वेळा कायदेशीर नोटीिसा बजावल्या आहेत.

तर याच संस्थेच्या आवारातील आणखी २ अनधिकृत होर्डिंग्जबाबत १९ मे २०२६ रोजी तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणात होर्डिंगधारक आणि शिक्षण प्रसारक मंडळीने पुणे महानगरपालिका तसेच महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकारातून (RTI) मिळालेल्या कागदपत्रांनुसार, संबंधित होर्डिंग व्यावसायिक आणि संस्थेमध्ये कोणताही वैध भाडेकरार झालेला नाही.

बेकायदेशीरपणे आर्थिक कमाई सुरूच


या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे आणि पुराव्यासह पुणे महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांची भेट घेऊन प्रत्यक्ष तक्रार करण्यात आली आहे. मात्र, इतका पाठपुरावा करूनही अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, कारवाई टाळली जात असल्यामुळे आजसुद्धा या अनधिकृत जाहिरात फलकांवरून बेकायदेशीरपणे आर्थिक कमाई सुरूच आहे.

शासनाची आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट पुरावे देऊनही आकाशचिन्ह विभाग कारवाईबाबत दिरंगाई का करत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा


अनधिकृत होर्डिंग्जच्या माध्यमातून शासनाची आणि महसुलाची होणारी फसवणूक रोखण्यात पुणे महानगरपालिकेचा आकाशचिन्ह विभाग अपयशी ठरत आहे. जर या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर युवक काँग्रेसच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तक्रारदार सागर धाडवे यांनी दिला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com



Share