Siya Goyal च्या वडिलांचे दुकान FDA कडून सील; खाद्यसाठा जप्त
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 min read

Siya Goyal : मार्केट यार्डातील 'गोयल अँड कंपनी'वर धाड; ४ हजार किलोहून अधिक संशयास्पद खाद्यसाठा जप्त
पुणे, महाराष्ट्र मिरर
Siya Goyal : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न भेसळीच्या विरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेचा मोठा दणका पुणे शहराला बसला आहे. दरम्यान, गुलटेकडी मार्केट यार्ड परिसरातील 'मेसर्स बी. जी. गोयल अँड कंपनी' या आस्थापनावर एफडीएने धाड टाकून तब्बल ८.१४ लाख रुपयांचा संशयास्पद आणि निकृष्ट दर्जाचा अन्नसाठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे, हे दुकान केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिचे वडील प्रवीण गोयल यांच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ( Siya Goyal father shop sealed pune )
४,१७२ किलो संशयास्पद साठा जप्त
एफडीएच्या पथकाने १४ जुलै रोजी या दुकानावर अचानक छापा टाकला. या कारवाईत पथकाला ४,१७२ किलो वजनाचा साठा सापडला, ज्याची बाजारपेठेतील किंमत ८,१४,६३० रुपये आहे. यामध्ये प्रामुख्याने १,२५८ किलो हळद पावडर, १,७७८ किलो सोया मिनी चंक्स, ५९८ किलो हळद पावडर (संत ब्रँड) आणि ५३८ किलो तीळ यांचा समावेश आहे.

हा सर्व माल निकृष्ट दर्जाचा आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा संशय एफडीएने व्यक्त केला आहे. या उत्पादनांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ( Siya Goyal )
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
बेकायदेशीर कारभार
प्राथमिक तपासात या पेढीचा कारभार अत्यंत बेजबाबदारपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. संबंधित आस्थापनाकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना किंवा अधिकृत नोंदणी उपलब्ध नव्हती. पूर्णपणे बेकायदेशीरपणे हा गोदामाचा कारभार चालवला जात होता. ( Siya Goyal )
तसेच, जप्त केलेल्या उत्पादनांवरील लेबलिंगच्या नियमांचेही गंभीर उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. एफडीएने या गंभीर बाबींची दखल घेत संबंधित दुकानाला पुढील आदेशापर्यंत 'स्टॉप बिझनेस' नोटीस बजावून दुकान सील केले आहे. ( Siya Goyal )

PUNE CRIME : कात्रजमध्ये ५.७९ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त
गोयल कुटुंबावर दुहेरी संकट
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल सध्या न्यायालयीन कोठडीत असतानाच, आता वडिलांच्या बेकायदेशीर व्यवसायावर एफडीएने कारवाईचा हातोडा मारल्याने व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. १८ जून रोजी लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल याला दरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर आहे. या गुन्ह्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात असलेले गोयल कुटुंब आता एफडीएच्या कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकारी निलंबित
भेसळखोरांविरुद्ध एफडीएचा इशारा
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना वठणीवर आणणे हा आहे. पुण्यात दूध भेसळीसह मसाल्यांच्या आणि इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत एफडीए आता अत्यंत कठोर भूमिका घेत आहे.

"विनापरवाना किंवा निकृष्ट दर्जाचा अन्न व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही," असा स्पष्ट इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे. आगामी काळात ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार असून, सर्व स्तरांवरील खाद्य व्यापार पेढ्यांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)


