Skip to content

Pune Crime : सिंहगड रोडवर दोघांकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त,आरोपीसह साथीदाराला अटक; एकूण ४१ हजार रुपयांचे शस्त्र जप्त

Pune Crime :पुणे : सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक गस्तीदरम्यान पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

सिंहगड रोडवर दोघांकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त,आरोपीसह साथीदाराला अटक; एकूण ४१ हजार रुपयांचे शस्त्र जप्त
सिंहगड रोडवर दोघांकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त,आरोपीसह साथीदाराला अटक; एकूण ४१ हजार रुपयांचे शस्त्र जप्त

Pune Crime :पुणे : सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक गस्तीदरम्यान पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. सूर्यराज मनोज निंबाळकर (वय २०) आणि गौरव राजू घाडगे (वय २०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची एकूण किंमत ४१ हजार रुपये आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार विनायक मोहिते आणि राहुल ओलेकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी सूर्यराज निंबाळकर आणि त्याचा साथीदार एकतानगरी परिसरातील मोकळ्या जागेतील पडीक इमारतीजवळ येणार आहेत. त्यांच्याकडे अग्निशस्त्र असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.

या माहितीची तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके यांना कल्पना देण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचला. तेथे संशयित दोघे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत सूर्यराज निंबाळकर याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, तर गौरव घाडगे याच्याकडे एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस आढळून आले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) आणि १३५ अन्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत घोरपडे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share