Skip to content

Pune News : नवनाथ बन लक्षात ठेव, तू एखाद्या माणसाचं चारित्र्यहनन करतोय ना, मी पण तुला सुट्टी देणार नाही: शिवराज मोरे

Pune News : पुणे : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान धांगडधिंग्याचा प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

नवनाथ बन लक्षात ठेव, तू एखाद्या माणसाचं चारित्र्यहनन करतोय ना, मी पण तुला सुट्टी देणार नाही: शिवराज मोरे
नवनाथ बन लक्षात ठेव, तू एखाद्या माणसाचं चारित्र्यहनन करतोय ना, मी पण तुला सुट्टी देणार नाही: शिवराज मोरे

Pune News : पुणे : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान धांगडधिंग्याचा प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ दाखवला होता. या व्हिडीओचा हवाला देत नवनाथ बन यांनी युवा काँग्रेसचे पदाधिकारी शिवराज मोरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. युवक आंदोलनातील नेता रस्त्यावर उतरून मुलीसोबतच्या व्यक्तीशी वाद घालतोय. रोहित पवार, हीच तुमची नाईट लाईफ आहे का?, असा सवाल नवनाथ बन यांनी विचारला होता. यावर शिवराज मोरे यांनी तात्काळ स्पष्टीकरण देत नवनाथ बन यांच्यावर पलटवार केला.https://maharashtramirror.com/ Pune News

तुम्ही सीडीआर काढून बघा. बारचा काही संबंध नाही , मी इथे होतो, इथून दीड वाजता निघालो. मी आंदोलनात उपोषणाला बसण्यापूर्वीचा हा व्हिडीओ आहे. माझी नार्को टेस्ट करा, मी कुठल्या बारमध्ये गेलो असेन तर. आंदोलन बदमान करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. नवनाथ बन लक्षात ठेव, तू एखाद्या माणसाचं चारित्र्यहनन करतोय ना, मी पण तुला सुट्टी देणार नाही, असा इशारा शिवराज मोरे यांनी दिला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share