Mumbai news : मुंबईत राजकीय संघर्ष अटळ; आदित्य-अमित ठाकरेंच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर तीव्र आंदोलनाची हाक, 300 आंदोलक ताब्यात!
Mumbai news :मुंबई :- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विविध विरोधी पक्षांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
1 min read

Mumbai news : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक; आज मनसेची महत्त्वाची बैठक, दादरमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Mumbai news :मुंबई :- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विविध विरोधी पक्षांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल दादर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान तब्बल 300 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. या आंदोलनात ज्युनियर ठाकरे बंधू (आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे) देखील प्रत्यक्ष सहभागी झाले होते. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीनंतर आंदोलकांना सोडवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर जमले आणि त्यांनी जोरदार ठिय्या मांडला. अखेर वाढता दबाव लक्षात घेत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका केली.https://maharashtramirror.com/ Mumbai news
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता; तेजस ठाकरेंची राजकीय पदार्पणासारखी उपस्थिती
कालच्या या आंदोलनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे राजकारणात सहसा सक्रिय नसणारे तेजस ठाकरे, जे पहिल्यांदाच अशा आंदोलनात पाहायला मिळाले. पोलीस ठाण्याबाहेर आल्यावर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी गाडीच्या छतावर चढून कार्यकर्त्यांना अभिवादन केले होते. मात्र, परवानगीशिवाय आंदोलन केल्याप्रकरणी आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी आज दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडून आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल केले जाण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. सेना भवन परिसरात आदित्य ठाकरेंनी घेतलेला ठिय्या आणि युवा सेनेचा आक्रमक पवित्रा यामुळे सरकारविरोधी संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक; आज पुन्हा मोठे आंदोलन होण्याची शक्यता
कालच्या धडक कारवाईनंतरही विरोधकांचा जोश कमी झालेला नाही. आज पुन्हा एकदा दादर शिवाजी पार्क परिसरात मोठे आंदोलन आणि मनसेतर्फे 'सह्यांची मोहीम' राबवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी 11 वाजता ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. ज्ञानेश कुमार यांनी एसआयआर (SIR) प्रक्रियेत परस्पर बदल केल्यामुळे कोट्यवधी मतदार डिलीट झाले असल्याचा गंभीर आरोप करत, "जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना आम्ही सलाम करतो. उद्याचे आंदोलन कुठे असेल ते लवकरच सांगू, सर्वांसाठी सुरक्षित जागा निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची राहील," असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे. या सर्व घडामोडींमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून आज पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.


