Skip to content

Delhi News : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी; मनिंदर सिंग मांडणार बाजू!

Delhi News :नवी दिल्ली :- शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी; मनिंदर सिंग मांडणार बाजू!
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी; मनिंदर सिंग मांडणार बाजू!

Delhi News :शिंदे गटाकडून विधिमंडळातील बहुमताचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता; 30 ऑक्टोबरपूर्वी सुनावणी पूर्ण होण्याची चिन्हे

Delhi News :नवी दिल्ली :- शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीमध्ये आज शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग हे युक्तिवाद करणार असून त्यांच्या युक्तिवादावर सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या या महत्त्वपूर्ण युक्तिवादावरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला ठरणार असल्याचे मानले जात आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News

नीरज कौल यांचा युक्तिवाद अंतिम टप्प्यात; मनिंदर सिंग यांच्याकडून आमदार अपात्रतेवर भर

मागील सुनावणींमध्ये शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. त्यांनी विधिमंडळातील बहुमताचा निकष अद्याप वैध असल्याचा युक्तिवाद करत, अपात्रतेचा अंतिम निर्णय होण्यापूर्वी आमदारांना अपात्र मानता येणार नाही, अशी बाजू मांडली होती. आजच्या सुनावणीची सुरुवात करताना नीरज कौल थोडावेळ आपली बाजू मांडतील, आणि त्यानंतर ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग युक्तिवाद पुढे चालवतील. मनिंदर सिंग हे प्रामुख्याने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर भर देणार असल्याचे सांगितले जात आहे. दुपारी 2 वाजल्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

30 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी संपवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे संकेत

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून ही संपूर्ण सुनावणी 30 ऑक्टोबरपूर्वी संपवण्याची तयारी सुरू आहे. एका वेगळ्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी यासंदर्भात तोंडी माहिती दिली होती. ही सुनावणी वेळेत पूर्ण होऊन दिवाळीच्या सुमारास किंवा त्यानंतर शिवसेनेच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share